Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचे धोरण नाही; ढवळीकर

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याने त्यांना सेवेत कायमस्वरुपी करण्याची मागणी विरोधकांनी केली.

दैनिक गोमन्तक

पणजी: विद्युत खात्यात सध्या 341 कंत्राटी लाईन हेल्पर आणि 119 मीटर रीडर आहेत. या कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरुपी करण्याचे कोणतेही धोरण सरकारचे नाही. त्यामुळे कायमस्वरुपी पदासाठी जाहिरात आल्यानंतर अर्ज करून योग्य प्रक्रियेतून त्यांची निवड केली जाईल, असे उत्तर वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आज विधानसभेत. त्यामुळे 15 वर्ष काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आले असल्याने त्यांना सेवेत कायमस्वरुपी करण्याची मागणी विरोधकांनी केली.

(no policy to retain contract employees, Minister Dhavalikar informed the Assembly)

आलेक्स सिक्वेरा यांनी कंत्राटाची कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्यात आल्यासंदर्भात प्रलंबित लक्षवेधी सूचना मांडली होती. त्‍यावर सुदिन ढवळीकर म्‍हणाले की, खात्‍यात जेव्‍हा कंत्राटी पद्धतीवर कर्मचाऱ्यांना घेण्यात आले होते, तेव्हा प्रक्रियेत काहींच्या मुलाखती घेतल्‍या होत्या. तर,काहींना थेट घेतले होते. काही पदांसाठी जाहिरात देण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रक्रियेबद्दल दिशाभूल करण्याचा प्रश्‍नच येत नाही.

पात्रतेसाठी सवलत!

लाईन हेल्पर यांच्यासाठी दहावी उत्तीर्ण पात्रता करण्यात आली आहे. परंतु, यात सवलत देण्याची आणि लेखी परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावर मुख्यमंत्र्यी प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून सलवतीचे आश्‍वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठ्या घडामोडी, रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?

SCROLL FOR NEXT