Valmiki Naik Aam Aadmi Party Dainik Gomantak
गोवा

‘आप’मध्ये भ्रष्टाचाराला अजिबात थारा नाही : वाल्मिकी नाईक

लाचप्रकरणात पंजाब मुख्यमंत्र्यांच्या कारवाईचे आपकडून स्वागत

दैनिक गोमन्तक

पणजी : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लाचखोरी प्रकरणात आपल्याच मंत्र्याविरुद्ध केलेल्या कारवाईचे गोव्यातील आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी स्वागत केले आहे.

यापूर्वी ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत २०१५ साली सत्ता स्थापन केल्यानंतर लाच मागणाऱ्या स्वतःच्या मंत्र्यांवर कारवाई केली होती.

लाच घेताना राज्य सरकारने आपल्याच मंत्र्याच्या विरोधात कारवाई करत अटक करण्याचा आदेश देण्याची ही ऐतिहासिक घटना आहे, असे मत वाल्मिकी नाईक यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ‘आप’चे उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई, राजदीप नाईक उपस्थित होते.

‘आप’चे मुख्य प्रवक्ते राजदीप नाईक म्हणाले, जनतेला दिलेली आश्वासने पाळणारा ‘आप’ हा एकमेव पक्ष आहे. पंजाबमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत ‘आप’ने निवडणुकीपूर्वी दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केले आहे.

वाल्मिकी नाईक म्हणाले की, पक्षाची स्थापना भ्रष्टाचारविरोधी तत्त्वांवर झाली असल्याने अशी कारवाई करणे हे केवळ ''आप''लाच शक्य आहे. इतर कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये असे झाले असते तर लाचेचे पैसे वाटून घेण्यावर चर्चा झाली असती आणि त्यात सहभागी असलेल्या मंत्र्याला शिक्षादेखील झाली नसती.

भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईनचे काय? :

भ्रष्टाचारविरोधी सरकार स्थापन करणार असे वचन दिलेल्या 'आप' सरकारने भ्रष्टाचार करणाऱ्या आमदारांविरोधात कारवाई केली आहे. भाजपने निवडणुकीपूर्वी भ्रष्टाचारविरोधी उपाययोजनेचा भाग म्हणून भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाईन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते आतापर्यंत पूर्ण झालेले नाही, असे राजदीप नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT