Chandrakant Babu Kavlekar  Dainik Gomantak
गोवा

Quepem News : केपेच्या विकासात कोणी राजकारण आणू नये : बाबू कवळेकर

गेल्‍या 20 वर्षांपासून मतदारसंघाचा विकास खुंटलाय : एल्टन

दैनिक गोमन्तक डिजिटल

केपे मतदारसंघाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करण्याची गरज आहे. विकासकामे मार्गी लावताना त्यात कोणी राजकारण आणू नये. मतदारसंघाच्‍या विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य असेल, अशी ग्‍वाही केपेचे माजी आमदार बाबू कवळेकर यांनी दिली.

सुबदळे-केपे येथे रस्‍त्‍याच्‍या हॉटमिक्स डांबरीकरण कामाच्‍या उद्‌घाटनावेळी कवळेकर बोलत होते. यावेळी विद्यमान आमदार एल्टन डिकॉस्‍टा हेही उपस्‍थित होते.

ते म्‍हणाले, केपेचा विकास हेच माझे ध्येय आहे. माझ्या मतदारसंघाचा चौफेर विकास व्हावा यासाठी मी माझा पूर्ण वेळ दिलेला आहे. अनेक प्रलंबित कामे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने मार्गी लावत आहे. वीज समस्‍याही मार्गी लावणार आहे.

यावेळी दक्षिण गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष खुशाली वेळीप, सुबदळेचे पंच विटे गावकर यांनीही विचार मांडले. बार्से सरपंच अर्जुन वेळीप, बाळ्ळी सरपंच गोविंद देसाई, सर्वानंद वेळीप, दत्ता वेळीप व इतर मान्‍यवर ‍उपस्थित होते.

"गेल्‍या 20 वर्षांपासून केपे मतदारसंघाला विकासकामांपासून वंचित रहावे लागले. मात्र यापुढे या मतदारसंघाची परिस्थिती बदलणार आहे. युवकांना नोकऱ्या, मूलभूत सुविधा प्राप्त करून देण्यास प्राधान्य दिले जाईल.'

एल्टन डिकॉस्टा, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT