Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute: म्हादईचे पाणी कोणीही वळवू शकत नाही

केंद्र आणि आयोगाकडे ‘डीपीआर’ मागणार असे राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Mahadayi Water Dispute: केंद्र सरकारच काय? पण म्हादईचे पाणी कोणीही वळवू शकणार नाही, असा ठामपणे राज्याचे ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम मत सांगितले.

केंद्रीय जल अयोगाने कर्नाटक सरकारच्या कथित कळसा-भांडुरा पाणी प्रकल्पाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला परवानगी दिल्याने गेला राज्यात असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. पांगम यांच्या विधानाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राने झुकते माप देऊन या प्रकल्पाच्या सुधारित सविस्तर प्रकल्प आराखड्याला मंजुरी दिली आहे. अर्थात ही केवळ तांत्रिकबाब असून हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी कर्नाटकला अनेक बाबींची पूर्तता आवश्यक आहे. हा संपूर्ण परिसर संवेदनशील वन विभागात येत असल्याने पर्यावरण आणि हवामान बदल खात्याबरोबर मुख्य प्रधान वनसंरक्षकांची परवानगी आवश्यक आहे.

त्यामुळे या तांत्रिक बाबीची परवानगी म्हणजे सर्व काही नाही. जल आयोगाने ज्या डीपीआरला परवानगी दिली आहे, त्याची कॉपी आम्ही आयोगाकडे मागवली आहे. ती मिळाल्यानंतर याबाबत राज्य सरकारला योग्य तो सल्ला दिला जाईल, असे पांगम म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Suyash Prabhudessai: गोमंतकीय क्रिकेटप्रेमींची घोर निराशा, अष्टपैलू 'सुयश' IPL मध्ये Unsold

Creative Minds of Tomorrow मध्ये 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी..

Goa Opinion: ‘घर नाही, पैसा नाही तरीही त्या दोघींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य माणुसकी शिकवणारं’

Health Tips: स्वतःकडे बरंच दुर्लक्ष होतंय, वेळ मिळत नाहीये; नेमकं करावं तरी काय?

Cash For Job Scam: अमेरिकेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून लाखोंना गंडा; मडगावात दोन भामट्यांविरोधात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT