Election  Canva
गोवा

Harvalem News: ..निवडणुकीसाठी 'एकही' अर्ज नाही? हरवळे पंचायतीत पहिला दिवस मोकळाच

Harvalem Panchayat: हरवळे पंचायतीच्या पाचही प्रभागात ९५४ महिला आणि १,०३७ पुरुष मिळून एकूण एक हजार ९९१ मतदारांची नोंद झाली आहे. अशी माहिती निर्वाचन अधिकारी प्रवीण गावस यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Bicholim Harvalem Panchayat Election

डिचोली: डिचोली तालुक्यातील हरवळे पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून (मंगळवारी) प्रारंभ झाला असला, तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. अशी माहिती या निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेले डिचोलीचे मामलेदार प्रवीण गावस यांनी दिली. येत्या २० ऑक्टोबर रोजी हरवळे पंचायतीच्या पाच प्रभागांसाठी निवडणूक होणार आहे.

हरवळे पंचायतीच्या पाचही प्रभागात ९५४ महिला आणि १,०३७ पुरुष मिळून एकूण एक हजार ९९१ मतदारांची नोंद झाली आहे. अशी माहिती निर्वाचन अधिकारी प्रवीण गावस यांनी दिली. प्रभाग- ४ मध्ये सर्वात ज्यास्त म्हणजेच ४९० तर प्रभाग-३ मध्ये सर्वात कमी म्हणजे २९७ मतदारांची नोंद झाली आहे.

प्रभाग-१ मध्ये ३७० (महिला-१७८ आणि पुरुष-१९२ मतदार). प्रभाग-२ मध्ये ४५३ (महिला-२२५ आणि पुरुष-२२८ मतदार). प्रभाग-३ मध्ये २९७ (महिला-१५२ आणि पुरुष-१४५ मतदार). प्रभाग-४ मध्ये ४९० (महिला-२६२ आणि पुरुष-२२८ मतदार). प्रभाग-५ मध्ये ४८१ (महिला-२३७ आणि पुरुष-२४४ मतदार).

२१ रोजी मतमोजणी

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची मुदत ९ ऑक्टोबर अशी असून, १० ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. ११ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. २० रोजी मतदान होणार असून, २१ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. पाच प्रभागांपैकी प्रभाग ४ आणि ५ महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती निर्वाचन अधिकारी तथा मामलेदार प्रवीण गावस यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Auction 2025: मास्टर ब्लास्टरच्या लेकाला मिळाला खरेदीदार! शेवटच्या क्षणी MI ने खेळला मोठा डाव

Mumbai - Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट, मुख्य बोगदा १५ दिवस राहणार बंद

Bhopal Goa Flight: भोपाळ ते गोवा थेट विमानसेवा! पहिल्यांदाच 180 आसनी क्षमतेचे बोईंग प्रवाशांच्या सेवेत

IPL Auction: 13 वर्षीय वैभव सूर्यवंशीवर पडला पैशांचा पाऊस, RR च्या ताफ्यात सामील; संजूच्या नेतृत्वाखाली करणार गर्दा!

धक्कादायक! 'गोवा सोड अन्यथा..', धमकी देत मारहाण करणाऱ्या 'मगो'च्या नेत्याला अटक

SCROLL FOR NEXT