Minister Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Panaji News : इस्पितळ देखरेख समित्यांवर यापुढे राजकीय नियुक्ती नाही : आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Panaji News : तज्ज्ञांची निवड सरकार करेल

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News : पणजी, राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इस्पितळांच्या देखरेख समित्यांवर राजकीय नियुक्त्या केल्या जाणार नाहीत,अशी महत्त्वपूर्ण घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज विधानसभेत केली. या समित्यांवर आमदारांच्या शिफारशीनुसार नियुक्ती केली जात असे.

सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर यांनी लक्षवेधी सूचनेवर बोलताना गोमेकॉत देखरेख समिती नेमलेली नाही आणि त्यासाठी नावांची शिफारस करणारे पत्र पाठवल्याचे नमूद केले होते. त्याला उत्तर देताना राणे यांनी अशा समित्यांवर विविध क्षेत्रात वावरणाऱ्या व्यावसायिक व तज्ज्ञांची निवड सरकार मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर करेल, असे सांगितले.

मूळ विषय हा अवयव व इतर रोपणाविषयी होता. अशा रोपणासाठी लागणाऱ्या वस्तू रुग्णांना विकत आणाव्या लागतात. त्यामुळे यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्याला राणे यांनी उत्तर दिले. आमदार वेन्झी व्हिएगश म्हणाले, मंत्र्यांना साऱ्या गोष्टींची माहिती नसते. तेथे रुग्णांच्या नातेवाईकांना पैसे मोजावे लागतात. बोरकर यांनीही हा मुद्दा मांडला.

‘गोमेकॉ’त अंतर्गत परीक्षण करणार!

आरोग्यमंत्री राणे म्हणाले, ‘गोमेकॉ’त रोपणाविषयी लागणाऱ्या जास्तीत जास्त वस्तू मोफत पुरवल्या जातात. दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजनेतही काहींचा समावेश केला आहे. रुग्णांना वाजवी दरात या वस्तू मिळाव्यात यासाठी ‘गोमेकॉ’ने काही पुरवठादारांशी दर करार केले आहेत.

त्यामुळे कोणत्याही पुरवठादाराकडून वस्तू घेतली तरी तोच दर द्यावा लागणार आहे. रोपणासाठी लागणाऱ्या वस्तूंची मागणी आणि पुरवठा याची स्थिती समजण्यासाठी परीक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. हे अंतर्गत परीक्षण सेवा सुधारण्यास मदत करेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: मांडवी एक्स्प्रेसमधून उतरला अन् पोलिसांच्या हाती लागला, 3.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नेपाळच्या नागरिकाला अटक

Artificial Intelligence: 'एआय'चा प्रभाव, वकील नामशेष होणार की आणखी सक्षम?

'रामाय स्वस्ति, रावणाय स्वस्ति' धोरण बाळगून रामराज्य येणार नाही ना टॅक्सीचालकांचा प्रश्न सुटेल; संपादकीय

Opinion: 'नाव' हे फक्त एक चिन्ह, खरी ओळख तर व्यक्तीच्या 'कर्तृत्वात'

गोव्याला मिळाले पहिले खासगी विद्यापीठ! 'Parul University'मध्ये 75% गोमंतकीय विद्यार्थी; CM सावंतांच्या हस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT