Workers protesting against the government 

Workers 

 

Dainik Gomantak 

गोवा

आता आश्वासने नको, ठोस कृती हवी; साखळीत सेसा कामगारांची भव्य रॅली

खाणी बंद झाल्यापासून कामगार (Workers) वाऱ्यावर पडले आहेत. कामगार आर्थिक संकटात अडकले आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली: खाण प्रश्नावरून अस्वस्थ असलेले डिचोलीतील सेसाचे (वेदांता) कामगार आता आक्रमक बनले असून, आज (गुरुवारी) हे कामगार पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. खाणींबाबत चालढकलपणा आणि फसवी आश्वासने बस्स झालीत. आता आश्वासने नकोत. ठोस कृती हवी आहे. अशी मागणी आणि सरकारचा निषेध करीत या कामगारांनी आज साखळीत (Sankhali) भव्य रॅली काढली.

नंतर साखळी शहरातील भाजप (BJP) कार्यालयावर धडक दिली. यावेळी कामगारांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना द्यावयाचे निवेदन कार्यालयात सादर केले. दरम्यान, हे निवेदन देण्यासाठी मात्र कामगारांना कार्यालयाबाहेर बराचवेळ तिष्ठत रहावे लागले. याबद्दल आंदोलनकर्त्या कामगारांनी नाराजी व्यक्त केली. खाणींबाबत सरकारची ठोस भूमिका स्पष्ट होत नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाहीत. असा कडक पवित्राही या कामगारांनी घेतला आहे.

रॅलीला प्रतिसाद

गेल्या 6 नोव्हेंबर रोजी अस्वस्थ कामगारांनी साखळीत धडक देत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांना घेरले होते. त्यावेळी खाणी सुरु करण्यासाठी खाण महामंडळ हा एकमेव पर्याय असल्याचे सांगून, खाणी निश्चितच सुरु होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी कामगारांना दिली होती. त्यानंतर दीड महिना वाट पाहूनही खाण महामंडळ वा खाणी सुरु करण्याबाबत ठोस कृती झालेली नाही. असा कामागारांचा दावा आहे. अस्वस्थ कामगार पुन्हा एकदा आज रस्त्यावर उतरले. कारापूर-तिस्क येथून या रॅलीला सुरवात झाली. विठ्ठलापूर येथील नवीन पुलावरून बाजारमार्गे भाजप कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली.

कामगारांनी सरकारच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या.सेसा कामगार संघटनेच्या झेंड्याखाली कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर आणि कायदा सल्लागार ऍड. अजय प्रभूगावकर यांच्या नेतृत्वाखाली छेडलेल्या या आंदोलनात 200 हून अधिक कामगार सहभागी झाले होते. आमच्यासह कुटुंबियांच्या भवितव्याचा विचार करून सरकारने एक तर खाणी त्वरित सुरु कराव्यात. अन्यथा शक्य नसेल, तर आम्हाला ताटकळत ठेवण्यापेक्षा सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. कामगारांची जबाबदारी घ्यावी. अशी मागणी संतप्त कामगारांनी केली आहे. कामगारांच्या भवितव्याशी कोणीही खेळू नये. असा इशाराही कामगारांनी दिला आहे.

कामगार वाऱ्यावर

खाणी बंद झाल्यापासून कामगार (Workers) वाऱ्यावर पडले आहेत. कामगार आर्थिक संकटात अडकले आहेत. घरसंसार चालवणे अवघड बनत आहे. कामगार आणि खाणींवर अवलंबून असलेले ट्रकवाले आणि अन्य घटकही अडचणीत आहेत. गोवा मुक्तीदिनाच्या हिरक महोत्सवाला आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाणींबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे दुर्दैव. आता आम्हाला आश्वासने नकोत. ठोस कृती हवी आहे. खाणी सुरु होणार की नाही, ते सरकारने स्पष्टपणे जाहीर करावे. कामगारांशी खेळू नये.

निर्णयात्मक कृती हवी

एकाबाजूने सरकार पुढील पाच वर्षे समृद्धीची अशा वलग्ना करीत आहे. मात्र खाण (Mine) प्रश्नावरून अनेकजण कंगाल झाले आहेत.

खाणप्रश्नी सरकारचा हेतू अस्पष्ट आहे. ई-लिलावाच्या खनिजाची उचल होते. तेव्हा आश्वासना व्यतिरिक्त कामगारांच्या पदरी काहीच पडत नाही. प्रादेशिक राजकीय पक्षांनाही कामगारांचे काहीच पडलेले नाही.आता आश्वासने नकोत. निर्णयात्मक कृती हवी आहे.

-ऍड. अजय प्रभूगावकर, कायदा सल्लागार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: प्रथमेश गावडे प्रकरणी तनिष्का चव्हाण आणि प्रीती चव्हाण यांना सशर्त जामीन मंजूर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT