Goa Police
Goa Police Dainik Gomantak
गोवा

No Leaves to Goa Police : इफ्फीच्या काळात गोवा पोलीस 'ऑन ड्युटी'; रजा मिळणार नाही

गोमन्तक डिजिटल टीम

No Leaves to Goa Police : इफ्फीच्या काळात गोवा पोलीस 'ऑन ड्युटी' असणार आहेत. इफ्फीमुळे गोव्यात सेलिब्रेटी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्यामुळे सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक शेखर प्रभूदेसाई यांनी आज एक परिपत्रक जारी केलं आहे.

गोवा पोलिसांना सुरक्षेच्या कारणामुळे 18 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात कोणत्याही कारणास्तव सुट्टी मिळणार नाही. गोव्यात 20 नोव्हेंबरपासून 27 नोव्हेंबरदरम्यान आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्र्यांसह सिनेजगतातील दिग्गज व्यक्ती गोव्यात येणार आहेत. आधीच पर्यटन हंगाम सुरु असल्यामुळे पोलिसांवर मोठा ताण आहे. त्यात इफ्फीमुळे अतिरिक्त ताण येणार असल्याने सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पणजीत 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणारा भारताचा 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा अधिक व्यापक करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाच्या मदत घेण्यात येईल. यंदा सर्वाधिक जागतिक प्रीमियर होतील. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 दिग्दर्शकांचे कलात्मक काम रसिकांना पाहता येईल, अशी माहिती पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक सत्येंद्र प्रकाश यांनी दिली.

पणजीत होणाऱ्या 53 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या इफ्फी (IFFI) ‘इंडियन पॅनोरमा’अंतर्गत दाखवल्या जाणार असलेल्या 25 फिचर फिल्म आणि 20 नॉन फिचर चित्रपटांची घोषणा महोत्सव संचालनालयाने केली आहे. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या इफ्फीत पाच मराठी, तर एका कोकणी चित्रपटाचा सहभाग आहे.

‘इंडियन पॅनोरमा’तील उद्‍घाटनाचा चित्रपट म्हणून पृथ्वी कोनानूर दिग्दर्शित ‘हादीनेलेंतू’ या कन्नड चित्रपटाची निवड केली आहे. अलीकडे केंद्र सरकारच्या (Central Government) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय चित्रपट विकास महामंडळाच्यावतीने (एनएफडीसी) ‘इंडियन पॅनोरमा’चे आयोजन केले जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

Goa Today's Live News Update: कोण होणार ताळगावचे सरपंच-उपसरपंच?

Mapusa Urban Bank: ''म्‍हापसा अर्बनच्‍या दयनीय स्‍थितीला पर्रीकरचं जबाबदार'', रमाकांत खलप यांचा सनसनाटी आरोप

Goa Drug Case: पिशवीत सापडला दोन लाखांचा गांजा; तिस्क उसगाव येथे तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT