Goa IMD Rain Update Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांना दिलासा! राज्यात पुढील 5 दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस

राज्यात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने केवळ 47 दिवसांत 75 इंचाची बारी ओलांडली.

दैनिक गोमन्तक

गोवा: उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्ह्यांमध्ये 5 दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहील. 19 जुलै रोजी कर्नाटक-केरळ किनारपट्टीसाठी वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेला असुन मच्छिमारांनी चिन्हांकित क्षेत्रांमध्ये न जाण्याचा इशारा हावामान खात्याने दिलेला आहे.

(No Heavy rainfall warnings for North And South Goa districts for 5 days)

राज्यात उशिरा दाखल झालेल्या मॉन्सूनने केवळ 47 दिवसांत 75 इंचाची बारी ओलांडली. आतापर्यंत 1918.9 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सौराष्ट्र आणि कच्छच्या दरम्यान निर्माण झालेला चक्रीय कमी दाबाचा पट्टा ओमानकडे सरकल्याने मुसळधार पावसाने रविवारी उसंत घेतल्याने अनेक दिवसानंतर लोकांनी कडकडीत उन्हाचा अनुभव घेतला.

अंदमान-निकोबारमध्ये 22 मे ला दाखल झालेल्या मॉन्सून केरळमध्ये ही वेळेअगोदर दाखल झाला. मात्र, कारवारजवळ मॉन्सूनने तब्बल 10 दिवसाची विश्रांती घेतल्याने राज्यात दाखल व्हायला त्याला नेहमीच्या वेळेपेक्षा ५ दिवस उशीर झाला. 10 जूनला राज्यात दाखल झालेला मॉन्सूनने केवळ 47 दिवसांत मोठी भरारी घेतली असून तो सरासरीपेक्षा 27.8 टक्क्यांनी जास्त आहे. अद्यापही ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने शिल्लक असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात 5 जुलैला 156.2 मिमी आणि 8 जुलैला 161.7 मिमी इतकी अतिवृष्टी स्वरूपाची हजेरी लावल्याने सरासरीतील कमी भरून काढली आहे.

सर्वाधिक पाऊस केपेत

राज्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस केपे येथे 2,322.8 मिलिमीटर झाला. त्या खालोखाल पेडणे येथे 2185.6 मिलिमीटर पाऊस पडला आहे. याशिवाय फोंडा येथे 2003.4 मिलिमीटर, सांगे येथे 2093.5 मिलिमीटर, काणकोण येथे 2077.6 मिलिमीटर, तर वाळपई येथे 2063.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

सरासरीपेक्षा जास्त पडलेल्या पावसाने आता उसंत घेतली आहे. पुढील आठवड्यात काहीच ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. अन्यथा सर्वत्र तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली. असे असले तरी गुजरात जवळच्या अरबी समुद्रात व बंगालच्या उपसागरात येत्या काही दिवसात कमी दाबाचे पट्टे निर्माण होण्याची शक्यता असल्याने 4 ते 5 दिवसानंतर पाऊस पुन्हा जोर धरू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT