पणजी: लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर गायब झालेल्या रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर पहिल्यांदाच आज (२४ जानेवारी) पणजीत पत्रकार परिषद घेतली. परबांनी गेल्या काही महिन्यात आत्मपरिक्षण केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. तसेच, पक्षाची पुढील भूमिका देखील स्पष्ट केली.
'विधानसभा आणि लोकसभा निकालाचे विश्लेषण केल्यानंतर चूका शोधून काढण्यासाठी आम्ही काही काळ विश्रांती घेतली. गेल्या सात महिन्यात आम्ही विविध पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन बैठका घेतल्या. आरजीपी अजून जिवंत आहे.
आम्हाला मोठा राजकीय वारसा आहे असे नाही, तसेच खूप पैसे आहेत असेही नाही. त्यामुळे २०२२ ची विधानसभा लढवण्यास अडचणी आल्या. पण, तरी देखील आम्ही सर्वात मोठा प्रादेशिक पक्ष झालो. लोकसभा निकालात देखील आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही', असे मनोज परब म्हणाले.
'गोव्याची अस्मिता आणि जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी आरजी पक्ष पुन्हा जोमाने चळवळ सुरु करणार, पक्षाला जनतेचा पाठिंबा असल्याचे परब यावेळी म्हणाले. तसेच, 'आरजीपी यापुढे विरोधी पक्षांच्या आघाडीचा भाग असणार नाही. विधानसभेत आवश्यक तेवढ्याच जागा स्वतंत्रपणे लढणार आणि पक्षात चर्चा करुनच मतदारसंघातील उमेदवार ठरवले जातील', असेही परब यांनी स्पष्ट केले.
अनेकांना आरजीचा फुटबॉल पंक्चर झालाय असं वाटल, अनेकांनी जल्लोष देखील साजरा केला. लोकसभा निवडणूक आमच्यासाठी डोळे उघडणारी निवडणूक होती. आर्थिक समस्या असल्याने सर्वांनाच काही काळ थांबण्याची सूचना देण्यात आली होती, जेणेकरुन आर्थिक स्थैर्य मिळवता येईल, असे मनोज परब म्हणाले.
एकमेव आमदार वीरेश बोरकरांची दांडी
पक्षाध्यक्ष मनोज परब यांनी काही महिन्यानंतर घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेला पक्षाचे एकमेव आमदार वीरेश बोरकरांनी दांडी मारली. याबाबत विचारले असता, ही माझी पत्रकार परिषद असून त्याला सर्वांनी उपस्थित राहण्याची गरज नाही, असे उत्तर परबांनी दिले. यावेळी बोरकर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यतांना देखील फेटाळून लावल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.