amit shah  Dainik Gomantak
गोवा

Amit Shah Goa Rally: अमित शाह यांच्या सभेच्या ठिकाणी 'नो फ्लाय झोन' घोषित

ड्रोनवरही बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Akshay Nirmale

Amit Shah Goa Rally: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गोव्यात रविवारी, 16 एप्रिल रोजी सभा होत आहे. या सभेद्वारे अमित शाह गोव्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकणार, अशी चर्चा सुरू आहे. फोंडा तालुक्यातील फार्मागुडी येथे ही सभा होणार आहे.

दरम्यान, या सभेच्या ठिकाणी नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला आहे. तशा प्रकारचे आदेश दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

फार्मागुडी येथील मैदानावर दुपारनंतर अमित शाह यांची सभा होणार आहे. या मैदानावरील ५ किलोमीटर क्षेत्रात नो फ्लायिंग झोनची घोषणा करण्यात आली आहे. दुपारी ३ ते रात्री ९ वाजेपर्यंत नो फ्लायिंग झोन लागू असेल. या काळात ड्रोन उड्डाणास देखील बंदी असणार आहे.

पुढील वर्षी देशात लोकसभा निवडणूक होईल. त्यासाठीची तयारी भाजपने सुरू केली आहे. त्यामुळेच भाजपसाठी अवघड ठरणाऱ्या शंभरहून अधिक लोकसभा मतदारसंघामध्ये केंद्रीय मंत्री वारंवार दौरा करत आहे. या मतदारसंघांची जबाबदारीच मंत्र्यांमध्ये वाटून दिली गेली आहे.

गोव्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. पैकी उत्तर गोवा मतदारसंघातून गत लोकसभा निवडणुकीत भाजपचे श्रीपाद नाईक विजयी झाले होते. ते सध्या केंद्रीय राज्यमंत्रीही आहेत. तथापि, दक्षिण गोव्यात मात्र भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले होते. दक्षिण गोव्यातून काँग्रेसच्या फ्रान्सिस सार्दिन यांनी बाजी मारली होती.

विशेष म्हणजे, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार जिंकला होता. तरीही २०१९ मध्ये येथून भाजपचा उमेदवार पराभूत झाला होता. आता अमित शाह यांच्या या सभेचे आयोजन करून भाजपने पुन्हा ही जागा परत जिंकायची चंग बांधल्याचे दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: कदंब बसच्या धडकेत 23 वर्षीय तरुणी ठार, एकजण जखमी; वेर्णा येथे झाला अपघात

Tilak Varma: आशिया कपमध्ये कमाल, आता तिलक वर्मा करणार कॅप्टन्सी! टीमची झाली घोषणा; पाहा संपूर्ण संघ

BJP Rath Yatra Goa: भाजपतर्फे 25 डिसेंबरपर्यंत रथयात्रा, पदयात्रा; मतदारसंघनिहाय मेळावे होणार, स्वदेशीचा नारा करणार बुलंद

PM Surya Ghar Scheme:'पीएम सूर्य घर मुफ्‍त बिजली'च्या जागृतीला चालना, उत्तर गोवा जिल्हा समन्वय समितीच्‍या बैठकीत निर्णय

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT