Goa Taxi Issue Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi Issue: गोव्यात ओला - उबरला थारा नाहीच; 10 सप्टेंबरला जाहीर होणार टॅक्सीच्या नव्या धोरणाचा मसुदा

No Entry For Ola - Uber In Goa: राज्य टॅक्सी धोरणाचा मसुदा तयार करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे टॅक्सीचालकांनी स्वागत केले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: टॅक्सीचालकांना दिलेल्या आश्वासनानुसार मंत्रालयात शुक्रवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो व इतर लोकप्रतिनिधींसमवेत बैठक पार पडली. सुमारे दीड तास झालेल्या चर्चेअंती मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व टॅक्सीचालकांचे मुद्दे ऐकल्यानंतर, राज्य सरकार १० सप्टेंबर रोजी टॅक्सीचा नव्या धोरणाचा मसुदा जाहीर करेल, असे आश्वासन दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीस विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मायकल लोबो, डिलायला लोबो, एल्टन डिकॉस्ता व इतर आमदारांची उपस्थिती होती. या बैठकीत टॅक्सीचालकांनी दररोज भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या, त्यावर सर्वांची मतेही ऐकून घेण्यात आली.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी पाचशेच्यावर टॅक्सीचालकांनी मंत्रालय परिसरात गर्दी केली होती. बैठकीला उपस्थित राहणाऱ्यांनाच ओळखपत्रे दिल्यानंतर त्यांना बैठकीस उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली.

विरोधी पक्षनेते आलेमाव म्हणाले की, चालकांनी टॅक्सी अॅप अग्रीगेटर धोरण रद्द करण्याची सूचना केली. यावेळी अनेकांनी आपल्या सूचना मांडल्या. मुख्यमंत्री सावंत यांनी आश्वासन दिले आहे की, १० सप्टेंबर रोजी गोवा राज्याचे नवीन टॅक्सी धोरण सादर केले जाईल.

आमदार मायकल म्हणाले, राज्य सरकारला स्वतःचे धोरण तयार करावे लागेल आणि डिजिटल प्लॅटफॉर्म सुनिश्चित करावा लागेल. आमच्या टॅक्सी ऑपरेटर्सनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर दर निश्चित करण्यास सरकारने सहमती दर्शविली आहे. आपण मुख्यमंत्र्यांना आपले स्वतःचे धोरण तयार करण्याचे सूचित केले आहे.

आजची बैठक यशस्वी झाली आणि आम्हाला विश्वास आहे की यातून एक उपाय निघेल. पारदर्शकता, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि समान किंमत यावर लक्ष केंद्रित केले जाईल. पर्यटनमंत्री खंवटे यांनी सांगितले की, त्यावर आता मुख्यमंत्री सावंत सर्व टॅक्सीधारकांची समस्या सोडवण्यासाठी धोरण आणतील. डिजिटलायझेशन अनिवार्य असेल. मात्र, ओला-उबरला परवानगी मिळणार नाही.

पारदर्शकता आणि सुरक्षिततेवर भर

बैठक पार पडल्यानंतर प्रसार माध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, सरकार केवळ दर सुसूत्रीकरणावरच नव्हे, तर पारदर्शकता आणि सुरक्षिततेवरही लक्ष केंद्रित करणारे टॅक्सी धोरण तयार करत आहे. पर्यटकांना सुरक्षित वाटेल याची खात्री होणे आवश्यक आहे.

व्यापक टॅक्सी धोरण तयार करताना त्यांच्या समस्या सुटतील याची पूर्णपणे सरकार काळजी घेत आहे. त्यासाठी सूचनाही मागविल्या आहेत आणि १० सप्टेंबरपर्यंत धोरणाचा मसुदा तयार होईल. हे धोरण पारंपरिक टॅक्सी व्यवसाय सुरू ठेवण्यास देखील मदत करेल

सरकारच्या निर्णयाचे स्वागत

राज्य टॅक्सी धोरणाचा मसुदा तयार करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे टॅक्सीचालकांनी स्वागत केले आहे. बैठकीस उपस्थित असलेल्या टॅक्सीचालकांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी आज झालेली चर्चा आमच्यासाठी अनुकूल राहिली.

पहिल्यांदाच टॅक्सीचालकांच्या समस्या सरकारने ऐकल्या मसुदा धोरणात त्यांचे मत समाविष्ट करण्यासाठी गोव्यातील टॅक्सी संघटनांशी सल्लामसलत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटक, स्थानिक किंवा टॅक्सीचालकांनाही त्रास होऊ नये अशी आमची इच्छा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचा डंका! वास्कोच्या मेघनाथने दुबईत जिंकली 2 रौप्य पदके; मेन्स फिटनेस स्पर्धेत वाढवला देशाचा मान

Viral Video: नवी कोरी थार काही दिवसांत बंद पडली; मालकाने गाढवं बांधून, ताशा वाजवत कार शोरुमला ओढत नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT