No electricity in Surla Sattari for four days goa Dainik Gomantak
गोवा

सुर्ला-सत्तरीत चार रात्री अंधार; वीज खाते निष्क्रिय

नागरिकांनी विचारला अभियंत्यांना जाब

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी तालुक्यातील घाटमाथ्यावर असलेल्या सुर्ला गावात गेल्या चार दिवसांपासून वीज गायब झाल्याने त्याचा परिणाम जनजीवनावर झाला. गेल्या चार दिवसांपासून अंधारात दिवस काढलेल्या सुर्ल गावातील नागरिकांनी शुक्रवारी वेळूस कार्यालयावर धाव घेऊन सहाय्यक वीज अभियंता दीपक गावस यांना जाब विचारला. (No electricity in Surla snd Sattari for four days goa)

चार दिवसांपासून वीज समस्या निर्माण झाल्याने सुर्ला गावच्या लोकांना त्रास सहन करावा लागला. नागरिकांनी आक्रमक भूमिका घेऊन वीज खात्याच्या निष्क्रीयतेबाबत ताशेरे ओढल्यानंतर वीज दुरुस्तीसाठी लाईनमन यांना पाठविण्यात आले.

ग्रामस्थ दीपक गावकर म्हणाले गेल्या चार दिवसांपासून गावात वीज नाही. त्यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. वीज नसल्यामुळे पिण्याचे पाणी मिळालेले नाही.

वीजपुरवठा सुरळीत करण्यात वीज कार्यालयात वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. वीज खात्याचे अधिकारी व लाईनमन यांना ग्रामीण भागातील जनतेचे काहीच पडून गेलेले नाही.

तब्बल 55 किलोमीटर अंतर पार करून वाळपईत वीज समस्येसंबंधी जाब विचारण्यास यावे लागते, हे वीज खात्याचे अपयश आहे. वीज दुरुस्ती यंत्रणा अत्यंत वाईट व कुचकामी असल्याचा अनुभव आला आहे, असेही गावकर म्हणाले.

संतोष गावकर म्हणाले, अभियंता दीपक गावस यांना सुर्ला गावातील वीज समस्येची माहिती दिल्यानंतरच त्यांना या प्रकाराची माहिती झाली. परंतु सुर्लसारख्या दुर्गम ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत होतो की, नाही हे पाहण्याची जबाबदारी हे खाते टाळत असल्याचा आरोप त्यांनी केला.

सत्तरी तालुक्यातील वीज समस्या सोडविण्यासाठी भूमीगत वीज वाहिन्यांचा प्रस्तावही तयार केला आहे. जेणेकरून भविष्यात वीज समस्या होणार नाही. जवळपास 80 कोटींच्या भूमीगत वीजवाहिनीचा प्रकल्प येणार आहे. त्याला मान्यता मिळणे गरजेचे आहे. प्रथम वाळपईत त्यानंतर भिरोंडा, पाडेली, झर्मे, म्हाऊस आदी गावासाठी हा प्रस्ताव तयार केल्याचे सहाय्यक वीज अभियंता दीपक गावस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT