dangerous buildings in Vasco city Dainik Gomantak
गोवा

Panjim: आश्‍‍चर्य! पणजीत एकही नाही धोकादायक इमारत, सार्वजनिक बांधकाम खात्‍याचा दावा

Goa PWD: सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यभरातील मोडकळीस आलेल्या २७ इमारतींची यादी तयार केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सार्वजनिक बांधकाम खात्‍याने राज्‍याच्‍या विविध भागांतील मोडकळीस आलेल्या २७ इमारतींची यादी तयार ​केली आहे. काही मोडकळीस आलेल्या इमारती, ज्यांची दुरुस्ती करता येत नाही, त्या पाडण्यात येणार आहेत.

तसेच काहींचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. विशेष म्‍हणजे राजधानी पणजीत अशी एकही जीर्ण इमारत नाही, जी कोसळू शकते, असा साबांखा अधिकाऱ्यांचा दावा आहे.

राज्‍यात अनेक ठिकाणी जीर्ण झालेल्‍या इमारती आहेत, ज्‍या कधीही कोसळून अनर्थ घडू शकतो. सध्‍या पावसाने जोर धरल्‍यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. त्‍यामुळे लोक भीतीच्‍या छायेखाली दिवस काढत आहेत. लोकवस्तीच्या भागात उभ्या असलेल्या काही जुन्या इमारतींची संरचनात्मक स्थिरता चाचणी घेणे बनली आहे.

साबांखा इमारत विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्यभरातील मोडकळीस आलेल्या २७ इमारतींची यादी तयार केली आहे. यापैकी काही इमारती, ज्यांचे नूतनीकरण होऊ शकत नाही, त्या पाडल्या जातील आणि उर्वरित जुन्या इमारतींचे नूतनीकरण केले जाईल.

राजधानी पणजी शहरात धोकादायक स्थितीत अशी एकही इमारत नाही जी कोसळू शकते. सार्वजनिक बांधकाम खात्‍याच्‍या वतीने पणजीतील तीन मोठ्या व जुन्या इमारतींचे नूतनीकरण लवकरच हाती घेण्‍यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम खात्‍याचे साहाय्यक अभियंता दत्तप्रसाद गावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

PM Narendra Modi: काँग्रेसनेच लष्कराला हल्ल्यापासून रोखले, '26-11'बाबत पंतप्रधान मोदींची टीका

GDS Recruitment: डाकसेवक पदांसाठी 'कोकणी' अनिवार्य! मराठीतून शिकलेल्‍यांनाही बंधनकारक, मुख्‍यमंत्र्यांकडून निर्णयाचे स्‍वागत

Goa Coconut: नारळ पीक का घटले? शुक्रवारी होणार चिंतन; 'गोमन्‍तक', 'ॲग्रोवन'तर्फे दोनापावला येथे राष्‍ट्रीय परिषदचं आयोजन

SCROLL FOR NEXT