Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Yellow Alert in Goa Due Heavy Rain: जलसंपदा खात्याच्या आकडेवारीनुसार राज्यातील चार धरणे ही ५० टक्क्याहून अधिक पाण्याने भरली आहेत.
Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?
Goa Rain News

राज्यात मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसानंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. मागील २४ तासांत राज्यात केवळ १८.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

वाळपई आणि साखळी येथील बसलेल्या मध्यम पाऊस सोडल्यास राज्यातील सर्वच भागात तुरळक पाऊस पडला. राज्यात पुढील चार दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली असून पुढील चार दिवस राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आत्तापर्यंत राज्यात एकूण १०११.२ मि.मी. म्हणजेच ३९.८१ इंच पावसाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात सरासरी पावसाच्या तुलनेत १.७ टक्के पावसाची घट आहे.

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?
Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

राज्यात मागील २४ तासांत सर्वाधिक ७७.१ मि.मी. पावसाची नोंद वाळपई येथे करण्यात आली असून त्या खालोखाल सांखळी येथे ६०.६ मि.मी., म्हापसा ३१ मि.मी., सांगे २५.४ मि.मी., जुने गोवा १९.८ मि.मी., फोंडा १९.८ मि.मी., पेडणे १६.४ मि.मी., केपे १५ मि.मी., पणजी १४.३ मि.मी., काणकोण ११ मि.मी., मडगाव ११ मि.मी., दाबोळी ९.४ मि.मी., तर मुरगाव येथे ५.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?
Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

चार धरणांत ५० टक्के जलसाठा!

जलसंपदा खात्याच्या आकडेवारीनुसार राज्यातील चार धरणे ही ५० टक्क्याहून अधिक पाण्याने भरली आहेत. तर काही धरणांची पातळी अजूनही कमीच आहे. साळावली धरण ६८ टक्के,चापोली ६० टक्के, आमठाणे ५५ टक्के, गांजे ८० टक्के, तिळारी ३७ टक्के, अंजुणे ३२ टक्के, तर पंचवाडी धरणात ४७ टक्के पाणीसाठा सद्यःस्थितीत उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com