No-confidence motion by eight corporators in Ponda Municipality Dainik Gomantak
गोवा

फोंडा पालिकेत आठ नगरसेवकांकडून अविश्‍वास ठराव

सहाव्या नगराध्यक्षाच्या प्रतीक्षेत आता फोंडा पालिका

दैनिक गोमन्तक

फोंडा : फोंडा पालिकेत आता सत्तांतर होणार असून त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. फोंडा पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्ष गिताली तळावलीकर व उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध आठ नगरसेवकांनी (Corporator) अविश्‍वास ठराव आणला आहे. काल हा अविश्‍वास ठराव दाखल करण्यात आला आहे.

या अविश्‍वास ठरावावर रितेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, आनंद नाईक, वीरेंद्र ढवळीकर, अर्चना नाईक डांगी, यतिश सावकर, विलियम आगियार व चंद्रकला नाईक यांच्या सह्या आहेत.

फोंडा (Ponda) पालिकेवर सध्या मगो प्रणित गट सत्तारूढ असून नुकत्याच राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळून सत्तेवर आल्याने आता फोंडा पालिका आपल्या कह्यात ठेवण्यासाठी भाजपने (BJP) प्रयत्न सुरू केले आहेत.

फोंडा पालिकेच्या या मंडळात आतापर्यंत पाच नगराध्यक्षांची निवड झाली असून हा अविश्‍वास ठराव संमत झाल्यास सहाव्या नगराध्यक्षाची निवड होणार आहे. सुरवातीला प्रदीप नाईक, त्यानंतर व्यंकटेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, शांताराम कोलवेकर तसेच आता गिताली तळावलीकर या पाचजणांची वर्णी फोंड्याच्या नगराध्यक्षपदी लागली असून सहाव्या नगराध्यक्षाच्या प्रतीक्षेत आता फोंडा पालिका आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT