Ritesh Naik Mayor of Ponda Municipal Council
Ritesh Naik Mayor of Ponda Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Ponda : होम ग्राऊंडवरच मंत्री रवी नाईक यांना मोठा धक्का; पुत्र रितेश नाईक यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव

गोमन्तक डिजिटल टीम

No Confidence Motion against Ponda Mayor Ritesh Naik : फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष रितेश नाईक यांच्याविरुद्ध आठ नगरसेवकांनी अविश्वास ठराव आज गुरुवारी दाखल केला. या अविश्वास ठरावावर नगरसेवक व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक, शांताराम कोलवेकर, प्रदीप नाईक, विलियम आगियार, गीताली तळावलीकर, अमिना नाईक, सीमा फर्नांडिस आणि जया सावंत यांच्या सह्या आहेत. पालिकेचा कार्यकाळ संपायला केवळ पाच महिने शिल्लक असताना हा अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. या पालिकेत एकूण पंधरा नगरसेवक असून त्यापैकी आठजणांनी हा ठराव आणला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा 8 विरुद्ध 7 असे बलाबल पालिकेत दिसून आले आहे.

कृषीमंत्री रवी नाईक यांचे सुपूत्र रितेश नाईक यांची फोंड्याच्या नगराध्यक्षपदी 13 एप्रिल रोजी निवड करण्यात आली होती, तर अर्चना डांगी यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली होती. फोंडा पालिकेच्या माजी नगराध्यक्ष गिताली तळावलीकर आणि उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध आणलेला अविश्‍वास ठराव 8 मार्च रोजी शुक्रवारी 9 विरुद्ध 0 मतांनी संमत झाला होता.

बराच काळ हुलकावणी देत असलेली फोंडा पालिका आता भाजपच्या ताब्यात आल्यामुळे मगो समर्थक नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाला हटवल्याने फोंडा पालिकेवरील मगो पक्षाचे (MGP) वर्चस्व गेलं होतं. फोंड्यात भाजपराज निश्‍चित होताच नगराध्यक्षपदी रितेश नाईक यांची वर्णी लागली होती.

फोंडा (Ponda) पालिकेच्या माजी नगराध्यक्ष गिताली तळावलीकर आणि उपनगराध्यक्ष जया सावंत यांच्याविरुद्ध रितेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, आनंद नाईक, वीरेंद्र ढवळीकर, यतिश सावकार, विलियम आगियार, अर्चना नाईक डांगी आणि चंद्रकला नाईक यांनी गेल्या 1 एप्रिल रोजी अविश्‍वास ठराव आणला होता. या ठरावावर चर्चा करण्यासाठी पालिकेत खास बैठक बोलावण्यात आली. यावेळी अविश्‍वास ठराव आणलेले आठही नगरसेवक तसेच व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक मिळून एकूण नऊ नगरसेवकांनी बैठकीला उपस्थिती लावली. नियमाप्रमाणे बैठकीचे कामकाज घेऊन ठरावाचा निकाल लावण्यात आला, त्यावेळेला ठरावावर सही न केलेले व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी ठरावाच्या बाजूने समर्थन दिले, त्यामुळे अविश्‍वास 9 विरुद्ध 0 मतांनी संमत झाला होता.

फोंडा पालिकेच्या माजी नगराध्यक्ष गिताली तळावलीकर यांची केवळ तीन महिन्यातच उचलबांगडी करण्यात आली होती. तर उपनगराध्यक्ष असलेल्या जया सावंत यांना केवळ पाच महिन्यांचा कार्यकाळ मिळाला होता. या पालिका मंडळात आतापर्यंत पाच नगराध्यक्ष फोंडा पालिकेने पाहिले असून त्यात प्रदीप नाईक, व्यंकटेश नाईक, विश्‍वनाथ दळवी, शांताराम कोलवेकर आणि गिताली तळावलीकर यांचा समावेश आहे. आता रितेश नाईक यांच्या विरोधातही अविश्वास ठराव आल्याने पुढचा महापौर कोण होतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Air India Express: एअर इंडिया एक्सप्रेसची गोव्याला येणारी फ्लाईट रद्द, दिल्ली विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ Video

Delhi Excise Policy Case: केजरीवाल विरुद्ध आमच्याकडे पुरावे, राजकारणाशी आमचा संबंध नाही; ED

Externment Orders: पास्टर डॉम्निक डिसोझा आणि जुआन मास्करारेन्हसला दिलासा; तडीपारीचा आदेश रद्द

SCROLL FOR NEXT