पिळगाव पंचायत सदस्य (Goa) Dainik Gaomantak
गोवा

Goa: पिळगाव सरपंचाची उचलबांगडी अटळ?

उपसरपंचासह चार पंच सदस्यांकडून अविश्वास

Dainik Gomantak

Goa: पिळगाव पंचायतीत (Pilgaon) आता सरपंच बदलाच्या हालचाली सुरु झाल्या असून, सरपंच निलेश (शंकर) जल्मी यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यात आला आहे. पंचायतीच्या एकूण सातपैकी विद्यमान उपसरपंचासह चार पंचसदस्यांच्या गटाने अविश्वास ठराव (No-confidence resolution) आणला असून, आज (मंगळवारी) सायंकाळी या गटातर्फे डिचोलीच्या गट विकास अधिकारी कार्यालयात अविश्वास ठरवाची नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे श्री. जल्मी यांची सरपंच पदावरून उचलबांगडी अटळ असून, पिळगाव पंचायतीला नवीन सरपंचाचे वेध लागले आहेत. गेल्या वर्षी जुलै महिन्याच्या 30 तारखेला निलेश जल्मी यांची पिळगावच्या सरपंचपदी निवड झाली आहे.

सरपंचांची उचलबांगडी अटळ

सात सदस्यीय पिळगाव पंचायतीच्या उपसरपंच सौ. उर्मिला परबगावकर यांच्यासह स्वप्निल फडते, संदीप सालेलकर आणि अनिल नाईक या चार पंचसदस्यांनी हा अविश्वास ठराव दाखल केला आहे. सरपंच जल्मी विकासकामांबाबतीत सहकारी पंचसदस्यांना विश्वासात घेत नाहीत. पंचायत कारभारात त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे. त्यातच पंचायत निधीचा गैरवापरही करण्यात येत आहे. असा आरोप अविश्वास ठराव दाखल केलेल्या गटाने केला आहे. त्यामुळेच सरपंच विरोधात अविश्वास ठराव आणावा लागला. असे या गटाने स्पष्ट केले. आमचा गट एकसंघ असून, हा अविश्वास ठराव संमत होणारच. असा दावा या गटाचे नेते संदीप सालेलकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT