Ashalata Wabgaonkar यांच्या पहिल्या स्मृतीदिनी काणकोणात विशेष कार्यक्रम

Ashalata Wabgaonkar यांच्या पहिल्या स्मृतीदिनी काणकोणात विशेष कार्यक्रमच्या जीवनचरित्रावर आधारित विद्यार्थ्यांसाठी निबंध व वाचन स्पर्धेचे आयोजन
Actress Ashalata Wabgaonkar
Actress Ashalata Wabgaonkar Dainik Gomantak
Published on
Updated on

आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकार आशालता वाबगावकर (Ashalata Wabgaonkar) यांच्या पहिल्या स्मृतीदिनी (1st Anniversary) काणकोणात (Canacona) बुधवारी (ता.२२) संध्याकाळी ४ वाजता चाररस्ता येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयाच्या सभागृहात (Shri Mallikarjun Vidyalaya Hall) विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. काणकोण कलाकार संघातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आकाशवाणीचे (AIR) निवृत्त निवेदक रामानंद जोशी यांच्याहस्ते आशालताताईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. या निमित्ताने आशालता ताईंच्या जीवनचरित्रावर विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या निबंध व वाचन स्पर्धा (Essay and reading competition) यावेळी होणार आहे.

Actress Ashalata Wabgaonkar
Goa: अतिक्रमण करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यांना मुरगाव पालिकेचा दणका

जेष्ठ लोककला अभ्यासक कमलाकर म्हाळशी आशालता ताईच्या गर्द सभोवती या पुस्तकावर भाष्य करतील, त्याशिवाय विकास देसाई, धिल्लन देसाई, अजित पैंगीणकर व कलाकार संघाचे अध्यक्ष अनिल फळ देसाई यावेळी आशालताईविषयी आपल्या भावना व्यक्त करतील.या कार्यक्रमाला श्री मल्लिकार्जुन विद्यालय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शांबा देसाई,तालुका सुकाणू समितीच्या अध्यक्षा मीना कामत व उपस्थित असतील.

Actress Ashalata Wabgaonkar
Goa: नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयाचा अभ्यास दौरा

आशालता वाबगावकर या पाळोळे येथील सुकन्या असून त्यांनी चित्रपट, मराठी संगीत नाटके, दूरचित्रवाणी, मालिका यामध्ये विविध भुमिका साकारल्या. त्या उत्कृष्ट गायिका देखील होत्या. त्याच्या कार्याचा व जीवन चरित्राचा परिचय युवा पिढीला व्हावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे संघाचे अध्यक्ष अनिल फळ देसाई यांनी सांगितले. काणकोण तालुक्यावर त्याचे निस्सीम प्रेम होते, त्याचसाठी येथील धार्मिक कार्यक्रमात त्या आवर्जून उपस्थित राहत. पुंडलिक नायक यांच्या देखणी दुराय या चित्रपटात त्यांनी प्रमूख भुमिका साकारली होती. त्या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण सादोळशे - काणकोण येथे करण्यात आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Double Engine Government Goa
Goa Job Scam
Devasa Quepem Cow Shelter Sheds Demolished
Private Waste Contractor Proposal Rejected
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com