Chandel Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Chandel Gram Sabha: 'अविश्वास' दर्शविण्यास बाऊन्सरसह आलेला पंच ग्रामस्थांकडून 'हायजॅक'

Hasapur Chandel Panchayat News: चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव शेवटी आवश्यक पंचांच्या संख्ये अभावी बारगळला.

Akshata Chhatre

मतदारांना विश्वासात न घेता सरपंच तुळशीदास गावास यांच्या विरोधात अविश्वास ठराव नोटिसेवर सही केली व गेले काही दिवस गायब होऊन शुक्रवार (दि. १२ डिसेंबर) रोजी अविश्वास ठराव चर्चेसाठी आलेल्या हसापूरचे पंचायत सदस्य बाळा शेटकर हे कारमधून उतरताच त्यांच्या प्रभागातील मतदारांनी त्यांना घेरून जाब विचारला व पंच सदस्य बाळा शेटकर हे ग्रामपंचायत कार्यालयात जाऊ शकले नाही. संपूर्ण पेडणे तालुक्याचे लक्ष लागून राहिलेला चांदेल हसापूरचे सरपंच तुळशीदास गावस यांच्याविरुद्धचा अविश्वास ठराव शेवटी आवश्यक पंचांच्या संख्ये अभावी बारगळला.

आमदार प्रवीण आलेकर विरुद्ध सरपंच तुळशीदास गावस असे या अविश्वास ठरावाला स्वरूप आले होते व दोघांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने याकडे संपूर्ण पडणे तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते. बाउन्सरसोबत आल्याने वातावरण तंग झाले. चांदेल ग्राम पंचायतीत एकूण पाच पंचायत सदस्य आहेत.

नेमके काय आणि कसे घडले?

पंच बाळा शेटकर हे एका कारमधून उतरले. यावेळी त्यांच्यासोबत काही व्यक्ती होते. पंच शेटकर हे गाडीतून उतरताच "तुला आम्ही निवडून दिले आहे. आम्हाला न विचारता तू कुणाच्या सांगण्यावरून अविश्वास ठरावावर सही केली व कुठे दडून बसलास होतास?

या अनोळखी व्यक्ती म्हणजे बाऊन्सर आहेत. हे बाऊन्सर तुला कोणी पुरवले? " अशा प्रश्नांचा भडिमार तेथे उपस्थित बाळा शेटकर यांच्या प्रभागातील नागरिकांनी त्यांच्यावर केला. लोकांच्या प्रश्नांना ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत.

दुसऱ्या बाजूने ग्रामपंचायत कार्यालयात नोटीसीवर सही केलेल्या उपसरपंच रुचिरा मळीक व प्रजय मळीक हे दोघेच पंचायत सदस्य राहिले. त्यामुळे आवश्यक संख्येअभावी ठराव मांडायाला व त्याला अनुमोदन देण्याएवढी संख्या नसल्याने पेडणे गटविकास कार्यालयातून आलेले निवडणूक निरीक्षक भिया ठाकूर यांनी हा अविश्वास ठराव बारगळल्याचे जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

Mopa Taxi Parking Rate: ..अन्‍यथा कुटुंबांसहित आंदोलन करु! टॅक्‍सीचालक संतप्त; मोपावरील वाढीव पार्किंग शुल्क मागे घेण्याची मागणी

Assagao Land Scam: SIT ने फास आवळला! आसगाव जमीन फसवणूक प्रकरणी 795 पानांचे आरोपपत्र सादर

SCROLL FOR NEXT