पेडणे: संततधार पडणाऱ्या पावसामुळे कळणे नदीच्या पातळीत वाढ झाल्याने चांदेल गावात पूरस्थिती उद्भवली. यामुळे गुरुवारी सकाळपासून ११.३० वाजेपर्यंत नागझर व कासारवर्णे गावचा संपर्क तुटला होता.
मात्र सध्या पूरस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले. चांदेल गावच्या दोन्ही बाजूंनी वाहने अडकून पडल्याने लोकांची बरीच गैरसोय झाली. दुपारी १२ वाजल्यापासून पुराचे पाणी ओसरू लागले व १ वाजल्यापासून रस्त्यावरील पाणी गेल्यानंतर वाहतूक सुरू झाली.
येथील रहिवाशी रमेश शेटये म्हणाले की , कळणे नदीत गाळ व अनेक जलपर्णी वाढल्या आहेत, त्यामुळे मोठा पाऊस झाल्यावर हे नदीचे पाणी गावात येते. त्यासाठी या नदीतील गाळ उसपल्यास वाढलेली झाडे हटवल्यास गावात पूरस्थिती उद्भवणार नाही.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.