Shantadurga Temple Dainik Gomantak
गोवा

Shantadurga Jatra: कोणत्याही समाजातील विक्रेत्यांवर बंदी नाही; श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण जत्रोत्सवात सामाजिक सलोखा

Shantadurga Fatarpekarin Devasthan: कोणत्याही धर्मीयाला मज्जाव करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतलेला नाही. तशी अधिकृत भूमिका कधीही नव्हती.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोमंतकीयांचे श्रद्धास्थान अर्थात फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानच्या जत्रोत्सवात दुकाने थाटण्यासाठी कोणत्याही धर्मीयावर वा समाजावर बंदी घातलेली नाही, असे अधिकृतरीत्या आज (२४ डिसेंबर) स्पष्ट करण्यात आले आहे.

समितीच्या पदाधिकाऱ्यांची केपे उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात या संदर्भात चर्चा करण्यात आली. फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण जत्रोत्सवात मुस्लीम समाजातील व्यक्तींना दुकाने लावण्यास निर्बंध असतील, अशी चर्चा होती.

त्यावर आता पडदा पडला आहे. बैठकीत सांगण्यात आले की, कोणत्याही धर्मीयाला मज्जाव करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतलेला नाही. तशी अधिकृत भूमिका कधीही नव्हती. आम्ही सामाजिक सलोखा कायम जपत आलो आहोत.

मुस्लीम समाजातील विक्रेत्यांना जत्रोत्सवात बंदी घातल्याच्या वृत्तांमुळे अन्य मंदिरांतूनही तसे निर्णय घेण्याचे प्रयत्न झाले. दरम्यान, प्रशासनाने तसे करणे कायद्यान्वये गैर ठरत असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच दैनिक गोमन्तकमधून दत्ता दामोदर नायक यांनी लेखाद्वारे परखड मांडणी करून धार्मिक सलोख्याविषयी भाष्य केले. त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.

प्रवेश बंदी कायदेशीर नाही : प्रशासन

बैठकीत उपजिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, देवस्थानच्या जत्रोत्सवात कोणत्याही विशिष्ट समुदायाला प्रवेश बंदी कायदेशीर नाही. ते त्यांच्या अधिकारांचे उल्लंघन ठरेल. भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसचे 'वरिष्ठ' नेते येणार गोव्यात! गोवा फॉरवर्डची यादीही रखडली; भाजपचा 7 अपक्षांना पाठिंबा

धक्कादायक! पाकिस्तानचे हेरगिरी जाळे गोव्‍यात उद्‌ध्‍वस्‍त, माजी सुभेदारासह महिला अटकेत; संवेदनशील माहिती पाठवल्याचा संशय

Horoscope: भावनिक निर्णय टाळा, नवे काम सुरू करण्यासाठी योग्य वेळ; 'या' राशीच्या लोकांसाठी विशेष ठरतोय आजचा दिवस

आईचा खून करुन मृतदेहाचे 16 तुकडे केले, उलट्या काळजाच्या मुलाला कोर्टाने ठोठावली जन्मठेप

अर्जुन तेंडुलकरविरुद्ध वैभवनं आक्रमक फलंदाजी केली, पण बिहार हरला; धमाकेदार सामन्यात गोव्याने नोंदवला शानदार विजय!

SCROLL FOR NEXT