Chess Grandmaster

 

Dainik gomantak

गोवा

नीतिशचे ध्येय ग्रँडमास्टर किताबाचे, हंगेरीतील बुद्धिबळ स्पर्धेत यश

ग्रँडमास्टर किताब प्राप्त करणे हेच आता आपले ध्येय असल्याचे नीतिशने गोव्यात परतल्यानंतर सांगितले

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्याचा युवा प्रतिभाशाली बुद्धिबळपटू नीतिश बेलुरकर याच्यासाठी हंगेरी दौरा फलदायी ठरला. बुडापेस्टमधील स्पर्धेत इंटरनॅशनल मास्टर (आयएम) किताबाची पूर्तता केल्यानंतर त्याने ग्रँडमास्टर किताबाचा पहिला नॉर्मही प्राप्त केला. आता त्याने ग्रँडमास्टर किताब मिळविण्याचे ध्येय बाळगले आहे.

नीतिशने शनिवारी रात्री मायदेशी आगमन झाले. त्यावेळी त्याच्या स्वागतास पालक, बुद्धिबळप्रेमी, गोवा बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार किशोर बांदेकर, संस्थापक सचिव पुंडलिक नाईक, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जीनो फार्मास्युटिकल्सचा सदिच्छादूत असलेल्या नीतिशने बुडापेस्ट येथे झालेल्या फर्स्ट सॅटरडे जीएम राऊंड रॉबिन बुद्धिबळ स्पर्धेत आयएम किताबाचा चौथा नॉर्म प्राप्त करताना 2400 एलो गुणांचा टप्पाही गाठला. त्यामुळे तो तांत्रिकदृष्ट्या आयएम किताबासाठी पात्र ठरला, त्याच्या या प्रतिष्ठेच्या उपलब्धीवर लवकरच फिडेकडून शिक्कामोर्तब होईल. एकदंरीत नीतिशने चार आयएम नॉर्म मिळविले, पण 2400 एलो गुणांचा टप्पा न गाठल्यामुळे तो या किताब प्राप्तीपासून दूर राहिला होता. अखेर बुडापेस्टमध्ये स्वप्न साकार झाले. नंतर बुडापेस्ट येथेच त्याने व्हेझेर्केप्झो ग्रँडमास्टर राऊंड रॉबिन स्पर्धा जिंकली आणि ग्रँडमास्टर किताबाचा पहिला नॉर्म पटकावला.

2500 एलो गुणांसाठी प्रयत्न

ग्रँडमास्टर किताब प्राप्त करणे हेच आता आपले ध्येय असल्याचे नीतिशने गोव्यात (goa) परतल्यानंतर सांगितले. त्याच्यापाशी आता या किताबाचा एक नॉर्म असून आणखी दोन नॉर्मची गरज आहे. सध्या त्याचे 2447 एलो गुण असून ग्रँडमास्टर (Grandmaster) बनण्यासाठी 2500 एलो गुण नोंदवणे आवश्यक आहे. हा टप्पा गाठण्यासाठी आपले प्रयत्न राहतील, असेही नीतिशने नमूद केले. गोव्याचे सध्या दोन ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Droupadi Murmu: राष्ट्रपती मुर्मूंचे गोव्यात जोरदार स्वागत! विक्रांत युद्धनौकेवर पाहिले नौदलाचे सामर्थ्य

Rashi Bhavishya 08 November 2024: तुमच्या परदेश वारीचं स्वप्न पूर्ण होणार; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Elvis Gomes: 'हा सगळा दाखवण्यापुरता प्रकार'! सरकारी जागेतील अतिक्रमणांवरील कारवाईबाबत गाेम्‍स असे का बोलले? वाचा..

'Cash For Job Scam' मध्ये 44 पीडित! अजून तक्रारदार असण्याची शक्यता; 'दीपश्री'ने ठकवले पावणेचार कोटींना

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

SCROLL FOR NEXT