nitin nabin  Dainik Gomantak
गोवा

Goa Elections 2027: प्लॅनिंग तयार, आता मैदानात उतरा! भाजप अध्यक्षांनी कार्यकर्त्यांना दिला 2027 च्या विजयाचा 'महामंत्र'; विधासभा निवडणुकीचं फुंकलं रणशिंग

Goa Assembly Elections 2027: 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विजयाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आक्रमक 'ॲक्शन प्लॅन' कार्यकर्त्यांसमोर मांडला.

Manish Jadhav

पणजी: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन सध्या दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर असून त्यांनी 2027 च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विजयाचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आक्रमक 'ॲक्शन प्लॅन' कार्यकर्त्यांसमोर मांडला. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी केवळ विजयाचाच नाही, तर प्रत्येक बूथवर किमान 50 टक्के मते मिळवण्याचे मोठे लक्ष्य निश्चित केले.

त्यांच्या मते, जर आपल्याला खरोखरच विकसित भारत आणि विकसित गोव्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर प्रत्येक बूथ अध्यक्षाने आपल्या बूथवर एनडीए आणि कमळ चिन्हाला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवून देण्याची शपथ घेतली पाहिजे.

नितीन नवीन यांनी आपल्या भाषणात गोव्याच्या (Goa) कानाकोपऱ्यात पक्ष पोहोचवण्यावर भर दिला. ते म्हणाले की, 2027 च्या निवडणुका आता जवळ येत आहेत, त्यामुळे आपल्याला केवळ काही विशिष्ट मतदारसंघांवर लक्ष केंद्रित करुन चालणार नाही. उत्तर-पश्चिमेतील पेडणेपासून ते उत्तर-पूर्वेतील वाळपईपर्यंत आणि दक्षिण-पश्चिमेतील काणकोणपासून ते दक्षिण-पूर्वेतील सांगेपर्यंत, अशा प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात भाजपची ताकद दिसून आली पाहिजे.

तळागाळातील कार्यकर्ता हा भाजपचा सर्वात मोठा आधार आहे आणि त्याने प्रत्येक घरात जाऊन सरकारच्या कामगिरीची आणि प्रयत्नांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. "बूथ लेव्हलपासून ब्लॉक लेव्हलपर्यंत संघटना जितकी भक्कम होईल, तितकाच आपला विजय निश्चित होईल," असे त्यांनी कार्यकर्त्यांना बजावले.

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, नितीन नवीन यांनी राज्य आणि जिल्हा पातळीवर निवडणुकीची रणनीती आधीच तयार असल्याचे स्पष्ट केले. आता या रणनीतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी कार्यकर्त्यांवर आहे. "प्लॅनिंग पूर्ण झाले आहे, आता अंमलबजावणी ही तुमची जबाबदारी आहे," असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय होण्याचे आवाहन केले. 50 टक्के मतांचे हे लक्ष्य गाठण्यासाठी प्रत्येक बूथ अध्यक्षाने आत्तापासूनच सूक्ष्म नियोजन (Micro-planning) करावे, अशी सूचना त्यांनी केली. नितीन नवीन यांच्या या आवाहनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा जोम संचारला असून, आगामी निवडणुकांसाठी भाजपने आत्तापासूनच 'इलेक्शन मोड' मध्ये प्रवेश केल्याचे या दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: भर मैदानात राडा! वॉशिंग्टन सुंदर अन् डेव्हिड मिलर भिडले, चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीज सोडल्यानं उफाळला वाद; व्हिडिओ व्हायरल

मैत्री, प्रेम अन् अघोरी छळ...! नग्न व्हिडिओ काढून केलं ब्लॅकमेल, चाकूनं वार करत तीन दिवस ठेवलं ओलीस; 19 वर्षीय विद्यार्थिनीवर नराधमाचा हल्ला

VIDEO: अनंत-राधिकाचा जबरदस्त 'स्वॅग'! मिका सिंगच्या गाण्यावर धरला ठेका, 30 मिनिटांच्या परफॉर्मन्ससाठी गायकानं घेतले 'इतके' कोटी

Pakistan Air Strike: पाक-अफगाणिस्तान संघर्षात भारताची 'एन्ट्री'! अफगाण जनतेच्या सुरक्षेसाठी दिला पाठिंबा; 70 दहशतवादी मारल्याचा पाकड्यांचा दावा

Gonychi League T20: 8 चौकार, 5 षटकार...'धेंपो'च्या विजयात अभिनवची स्फोटक फलंदाजी

SCROLL FOR NEXT