Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: चिकन विक्रेते निघाले ‘गांजा सप्लायर’! मडगाव पोलिसांकडून धक्कादायक बाब उघड; 'मोठे' रॅकेट असल्याचा अंदाज

Goa Drugs Case: निपाणीत मोठ्या प्रमाणात तंबाखुची लागवड केली जात आहे. काहीजण तेथे गांजा लागवड करतात. गोव्यात हा गांजा पाठवला जातो.

Sameer Panditrao

मडगाव: मडगाव पोलिसांनी कर्नाटकातील निपाणी येथील अटक केलेले फिरोज व नदीम हे दोघेही चिकन विक्रेते असून ते गोव्यात गांजा  पुरवत होते, अशी धक्कादायक बाब  तपासात उघड झाली आहे.

 ते दुचाकीवरून मडगावला गांजा घेऊन आले होते. पोलिसांना  त्याचा सुगावा लागला होता. रविवारी  सापळा रचून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडील दुचाकीही पोलिसांनी  जप्त केली आहे. 

सोमवारी दोघांना मडगावच्या प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.  संशयितांकडे ३.८०१ किलो गांजा सापडला. त्याची किंमत  ३ लाख ८० हजार इतकी आहे.

निपाणीत  मोठ्या प्रमाणात तंबाखुची लागवड केली जात आहे. काहीजण तेथे गांजा  लागवड करतात. गोव्यात हा गांजा पाठवला जातो. त्याचे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. संशयित वारंवार गोव्यात चिकन पुरवठा करण्यासाठी येत होते, त्याचे येथे काही खास ग्राहकही होते, असे पोलिस सांगतात.

चौकशी दरम्यान सर्व गोष्टी उघड होणार आहेत.  पोलिस निरीक्षक सूरज सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर गावकर तपास करीत आहेत.  अमली पदार्थ प्रतिबंधकात्मक  कायद्याखाली पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cooking Oil Recycling: हॉटेल्स, रेस्टॉरंट्सच्या वापरलेल्या तेलाची डिजिटल नोंद होणार? गोवा सरकारला 18 महिन्यांचा आराखडा; प्रस्तावित नियम काय?

Supreme Court: 'धर्मांतरानंतर आरक्षणाचा लाभ मिळणार नाही'! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; नेमंक प्रकरण काय?

Imran Khan: 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोड! इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस, सीजेपी आंदोलनात सहभागी होणं पडलं महागात

State Library Policy: वाचनालय धोरणाचे भिजत घोंगडे कायम! ग्रामीण ग्रंथपालांचे वेतन आणि डिजिटल वाचनालयाचा प्रश्न प्रलंबित

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

SCROLL FOR NEXT