Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: गोव्यातील समुद्र किनाऱ्यावरील हालचालीवर येणार निर्बंध; बीचच्या धारण क्षमतेचा NIO करणार अभ्यास

Goa Beach: पर्यटन क्षेत्राचे नियोजन करण्यासाठी अशा अभ्यासाची गरज आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सरकारने शॅकच्या संख्येवर मर्यादा घातल्यानंतर आता समुद्र किनारी भागातील पारंपरिक मच्छीमार वगळता इतर हालचालींवरही निर्बंध येणार आहेत. राज्यातील किनाऱ्याची धारण क्षमता किती याचा अभ्यास करण्याचे सरकारने ठरवले आहे.

यासाठी पर्यावरण खात्याने प्रस्ताव तयार केला असून तो दोनापावलच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला (NIO) अंमलबजावणीसाठी दिला जाणार आहे.

पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, किनारी गोव्याची धारण क्षमता किती हे तपासले गेले पाहिजे. म्हणजे त्या भागातील विविध उपक्रमांचे नियमन करता येणार आहे. सध्या अशा अभ्यासाअभावी किनारी क्षेत्रावर निर्बंध लादला येत नाहीत.

पर्यटन क्षेत्राचे नियोजन करण्यासाठी अशा अभ्यासाची गरज आहे. एनआयओकडे हे काम सोपवले जाणार आहे. तसा प्रस्ताव त्यांना सादर करण्याची प्रक्रिया पर्यावरण खात्याकडून केली जात आहे. त्यानंतरच शास्त्रीय पद्धतीने याचा अभ्यास होऊ शकणार आहे.

पश्चिम घाटासंदर्भात काही प्रश्न केंद्र सरकारच्या पातळीवर प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. कायद्याच्या चौकटीत राहूनच हे सारे केले जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT