Old man | Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: नव्वदीतही तारुण्याचा उत्साह

Goa News: टेलरिंग व्यवसाय : डिचोलीतील आत्मनिर्भर ‘मनू टेलर’ची कथा

दैनिक गोमन्तक

Goa News: वय नव्वदीकडे झुकलेले, शरीरही हवी तशी साथ देत नाही, तरीदेखील आजही ते थरथरत्या हातांनी सुईशी धागा जुळवून कपडे शिलाई करतात. ही एखाद्या सिनेमातील कथा नव्हे, की काल्पनिक कथानक, तर हे वास्तव आहे. ‘मनू टेलर’ या टोपण नावाने परिचित असलेले 87 वर्षांचे मनोहर गावकर आजही टेलरिंग व्यवसायात सक्रिय आहेत.

डिचोलीतील बाजार संकुलात गेल्यास ‘मनू टेलर’ उघड्यावर मशिन घेऊन कपडे शिलाई करताना दिसतात. फाटलेले जुने कपडे नीटनेटके करून देतात. आता आरोग्य साथ देत नाही. परंतु कुटुंबाचा प्रपंच सांभाळला, तो शिलाई व्यवसाय मला घरी स्वस्थ बसू देत नाही, असे मनू सांगतात.

मदतनीस ते टेलर

  • मये पंचायत क्षेत्रातील हातुर्ली गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या मनोहर (मनू) गोविंद गावकर यांचा टेलरिंग व्यवसायापर्यंतचा प्रवास तसा मेहनतीचा आहे. जेमतेम तिसरीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर वयाच्या पंधराव्या वर्षी काहीतरी करावे, या ईर्षेने मनू यांनी घराबाहेर पाय टाकला.

  • डिचोलीतील त्यावेळचे शिंपी युसूफ यांच्याकडे त्यांनी मदतनीस म्हणून काम केले. सुरुवातीस मनू शर्टांना बटण लावायचे काम करीत. हळूहळू त्यांनी माप कसे घेतात, कापड कटिंग आणि शिलाई कशी करतात, त्याचे बारकाईने निरीक्षण सुरू केले.

  • युसूफनंतर हुसेन मिर्जा या टेलरकडे त्यांनी काम करून शिलाईकामातील बारकावे जाणून घेतले. साधारण तीन वर्षांनी त्यांनी जमा झालेल्या पैशांतून शिलाई यंत्र (मशिन) घेतले आणि डिचोली बाजारात स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. आजही ते या व्यवसायात आहेत.

शेती सांभाळून काम :

लहानपणापासूनच मला शेतीची आवड. शेती व्यवसायात वडिलांना मदत करीत असे. पुढे टेलरिंग व्यवसाय करताना पारंपरिक शेती करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले नाही. आरोग्य साथ देत नसल्याने आता शेतीत काम करणे शक्य होत नाही. शेती आणि जोडीला टेलरिंग व्यवसाय यामुळे घरसंसार आणि मुलाबाळांचा सांभाळ करणे सोपे झाले, असे मनू सांगतात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Telangana Drug Factory: ड्रग्स माफियांचा 12 हजार कोटींचा कट उधळला! तेलंगणात पोलिसांची मोठी कारवाई; 13 आरोपी गजाआड

Goa Trip Scam: 'थेरपिस्‍ट'सोबतची गोवा ट्रीप वकिलासाठी ठरली 'हनिट्रॅप'; युवतीकडून खासगी फोटो उघड करण्याची धमकी, 20 लाख लुबाडले

Margao: रेल्वे स्थानकावर महिलांना लुबाडणारा चोरटा जेरबंद, 1 लाख 60 हजाराची सोनसाखळी हस्तगत

Belgaum Goa Highway: अर्धवट हत्ती ब्रिजचं काम सुरु होणार; बेळगाव-गोवा महामार्गावरील 'हा' रास्ता मार्ग दीड महिना बंद

Anant Chaturdashi: "नव्या सुरुवातींचा, श्रद्धेचा आणि आशेचा दिवस" अनंत चतुर्दशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT