Goa Viral Video: काहीही हं.... गोव्यात चक्क 'Old Monk Tea' ! व्हिडिओ पाहून नेटकरी कोमात

Tea Viral Video: गोव्यात सापडलेल्या या अनोख्या चहाचा व्हिडिओ सोशल मीडिया चांगलाच व्हायरल होत आहे.
Goa Viral Video
Goa Viral VideoDainik Gomantak

गोवा उत्तम पर्यटन स्थळांसाठी ओळखले जाते. येथील अनेक सुंदर ठिकाणांना भेट देण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक (Tourist) येतात आणि निर्सगाच्या प्रेमात पडतात. गोवा तसे समुद्रकिनाऱ्यासांठी प्रसिध्द आहे. मात्र, आजकाल गोव्याची चर्चा आणखी एका कारणाने होत आहे आणि ती म्हणजे 'चहा'. तसे तर तुम्ही मसाला चहा, बारबेक्यू चहा अशा अनेक प्रकारच्या चहाचा आस्वाद घेतला असेल पण तुम्ही कधी 'मद्यचहा' घेतला आहे का? वाचून आश्चर्यचकित झालात ना! होय, हा चहा सध्या गोव्यात (Goa) मिळत आहे, ज्याला 'ओल्ड मंक टी' (Old Monk Tea) म्हटले जात आहे.

  • गोव्यात मिळतेय 'ओल्ड मंक टी'

    गोव्यातील (Goa) सिंक्वेरिम बीचवर चहा आणि ओल्ड मंक रम मिक्स करुन एक वेगळाच चहा विकला जात आहे. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर (Social Media) चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणून गरम चुलीतून चिमट्याने एक मातीचे लहान भांडे बाहेर काढतो आणि त्यात काहीतरी ठेवतो, ज्यामुळे लगेच भांड्यात आग लावते. यानंतर तो भांड्यात थोडी रम टाकतो, ज्यामुळे आग आणखी वाढते. मग तो जळत्या भांड्यात चहा टाकतो, ज्यामुळे आग विझते, चहा आणि रम दोन्ही एकत्र मिक्स करतो आणि अनोखा 'ओल्ड माँक टी' सर्व्ह करतो.

  • कसा बनतोय हा अनोखा चहा

या अनोख्या चहाचा व्हिडिओ @DrVW30 या नावाने ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करत 'गोव्यातील ओल्ड मंक टी. शेवट जवळ आहे' असे कॅप्शन लिहिले आहे. 45 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 29 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओवर लाईकचा वर्षाव केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com