Crime news Dainik Gomantak
गोवा

आपल्याच सहकाऱ्याचा खून करणाऱ्या निमा तमंग याला जन्मठेपेची शिक्षा

पैशांच्या हव्यासापोटी आपल्याच सहकाऱ्याचा खून करून त्याचे पैसे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या निमा तमंग या नेपाळी वेटरला आज दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

सुशांत कुंकळयेकर

मडगाव : पैशांच्या हव्यासापोटी आपल्याच सहकाऱ्याचा खून करून त्याचे पैसे घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या निमा तमंग या नेपाळी वेटरला आज दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

या आरोपीवर आपला सहकारी रणजित सिंग (33) याचा खून केल्याचा आरोप होता. या आरोपीला खून केल्याबद्दल जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड (दंड न भरल्यास 1 वर्षाची अतिरिक्त साधी कैद) व चोरी केल्याबद्दल 5 वर्षाची सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड (दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त साधी कैद) अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणी काणकोणचे तत्कालीन पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई यांनी तपास केला होता.

हा खून 12 फेब्रुवारी 2019 रोजी पाळोळे काणकोण येथे घडला होता. आरोपी आणि मयत हवाना कुबा नावाच्या शॅकवर काम करत होते. 12 फेब्रुवारीच्या मध्यरात्री जवळ झोपलेल्या सहकाऱ्याच्या डोक्यात दंडुक्याने वार करून त्याचे पैसे आणि दोन मोबाईल फोन घेऊन पळ काढला होता. पोलिसांनी त्याला नंतर काणकोण पोलीस स्थानकावर अटक केली असता त्याच्याकडे 11,310 रुपये रोख व रणजित सिंग नावावर नोंद झालेले दोन मोबाईल सापडले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT