Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

ताबा नसल्याने सरकारी इमारतींची रखडली डागडुजी; काब्राल देणार मुख्यमंत्र्यांना पत्र

रिक्त जागा भरण्यात येईपर्यंत कंत्राटी पद्धतीवर किमान 100 कामगार नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवणार : काब्राल

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा साधनसुविधा विकास महामंडळातर्फे (जीएसआयडीसी) बांधण्यात आलेल्या काही इमारतींची स्थिती भयानक आहे व त्याची त्वरित डागडुजी करण्याची गरज आहे. या इमारतींचा ताबा सार्वजनिक बांधकाम खात्याकडे देण्यात आलेला नाही त्यामुळे त्याची डागडुजी प्रलंबित आहे. त्या इमारतींचा ताबा खात्याकडे देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र देणार असल्याची माहिती बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. (Nilesh Cabral to write a letter to CM Pramod Sawant about Repairing of government buildings)

अनेक सरकारी इमारतींची अवस्था बिकट झाली आहे. त्याची वेळोवेळी डागडुजी करण्यात न आल्याने त्या मोडकळीस आल्या आहेत. त्याकडे त्वरित लक्ष देऊन त्याची डागडुजी व्हायला हवी. या इमारतींचा ताबा बांधकाम खात्याकडे महामंडळाने बांधून झाल्यानंतर दिला नाही त्यामुळे त्या इमारतींची डागडुजी करण्याबाबत अडचणी येत आहेत. सरकारने राज्यातील अनेक प्रकल्पांची कामे गोवा साधनसुविधा विकास महामंडळमार्फत (जीएसआयडीसी) करण्यासाठी ‘स्पेशल पर्पज व्हेईकल’ (एसपीव्ही) स्थापन केले होते. मात्र या महामंडळाने इमारती मोडकळीस आल्या तरी त्याच्या डागडुजीसाठी बांधकाम खात्याकडे ताबा दिलेला नाही, तो त्वरित द्यावा व त्यासाठी राज्य अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहे, असे काब्राल म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरभरती प्रक्रियेबाबत आरोप झाल्याने ती प्रक्रियाच बंद करण्यात आली आहे यासंदर्भात मत व्यक्त करताना मंत्री काब्राल म्हणाले की, सरकारने यासंदर्भात यापूर्वीच चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी समिती स्थापन करून चौकशी सुरू आहे. जोपर्यंत ही समिती चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करत नाही तोपर्यंत वाट पाहिली जाईल. मात्र दरम्यानच्या काळात अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे व रिक्त जागा भरण्यात येईपर्यंत कंत्राटी पद्धतीवर किमान 100 कामगार नियुक्ती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. ही कंत्राटी पद्धतीवरील कामगार नियुक्ती गोवा राज्य कर्मचारी निवड आयोगातर्फे करण्यात यावी अशी शिफारस मुख्यमंत्र्यांना करणार आहे.

नोकरभरती घोटाळाप्रकरणी अजूनही चौकशीचा अहवाल दिलेला नाही. या खात्यात विविध पदांसाठी सुमारे 300 जागा भरण्यात येणार होत्या. माजी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांच्याविरुद्ध या घोटाळ्याचा आरोप विरोधक व भाजपच्या आमदारांनीच केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Hardik Pandya Video: हार्दिकच्या धडाकेबाज खेळीवर गर्लफ्रेंड फिदा! सोशल मीडियावर रंगली 'फ्लाइंग किस'ची चर्चा; मैदानावरच प्रेमाचा वर्षाव

IND vs SA 5th T20: अहमदाबादमध्ये हार्दिक पांड्याचं वादळ, 16 चेंडूत ठोकलं अर्धशतक; अभिषेक शर्माचा मोडला रेकॉर्ड VIDEO

..तांबडया समुद्रातून बेट मागे टाकल्यावर बोट 'सुएझ कालव्या'त शिरली! गोव्यासाठी लढलेल्या वीरांच्या कारावासातल्या भयाण आठवणी

U19 Asia Cup 2025: भारताचा श्रीलंकेला विजयाचा 'धोबीपछाड'; फायनलमध्ये रंगणार भारत-पाक हायव्होल्टेज थरार! VIDEO

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

SCROLL FOR NEXT