Nilesh Cabral to solve Margao Garbage problem Dainik Gomantak
गोवा

पर्यावरण मंत्र्यांकडून मडगाव वासीयांसाठी नवीन योजना

दोषी सापडल्यास कडक कारवाई

दैनिक गोमन्तक

मडगाव : रामनगरी-नेसाय येथे लोकांकडून रस्त्याच्या कडेला कचरा (Garbage) टाकला जातो. त्यावर उपाय म्हणून येत्या सहा दिवसांत या भागात कचरा संकलन केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे माजी पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल (Nilesh Cabral) यांनी सांगितले.

काब्राल यांनी आज रामनगरी परिसराला भेट देऊन ही समस्या जाणून घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर स्थानिक पंचसदस्य व कचरा व्यवस्थापन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. परिसर यावेळी साफ करण्यात आला.

स्‍वच्‍छता राखण्यासाठी आता नागरिकांनीही आपली जबाबदारी उचलण्याची गरज आहे, अन्यथा अशा प्रकारांवर आळा आणण्यासाठी जबर दंड वसूल करण्यासारखे उपाय राबविण्याची गरज त्‍यांनी व्यक्त केली.

या परिसरात एका निवासी प्रकल्पाचे सांडपाणी वाहून रस्त्यावर येते. मंत्र्यांचे लक्ष या समस्येकडे ओढले असता सोमवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तज्ज्ञांकडून तपासणी केली जाणार असून त्यात कुणी दोषी सापडल्यास कडक कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. राज्यात पुन्हा एकदा भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. भाजप (BJP) नेत्यांनी आपल्या मंत्रिपदाची शपथ घेताच कामाला सुरुवात केल्याचे दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Goa Nature Conference 2026: निसर्गाशी नाते करा घट्ट! गोव्यात रंगणार पहिले निसर्ग संमेलन; तारीख, वेळ जाणून घ्या..

क्रिकेट विश्वावर शोककळा! रणजी क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू, बॅटिंगनंतर छातीत दुखू लागले अन्...

Kushavati District: ‘कुशावती’बाबत नवीन अपडेट! भाडेकरू, हॉटेल कामगारांच्या पडताळणीचे आदेश; ओळखपत्राची सक्ती

SCROLL FOR NEXT