Nilesh Cabral |Goa Government Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: बिलांची थकबाकी असल्यास अभियंत्यांवर कारवाई

मंत्री काब्राल : सत्तरीत चुकीची पाणीबिले आल्याचा मंत्री राणेंचा दावा

दैनिक गोमन्तक डिजिटल

Nilesh Cabral: थकित पाणी बिलांच्या एकरकमी परतफेड योजनेला (ओटीएस) 16 मार्चपर्यंत शेवटची मुदतवाढ दिली आहे. परंतु यापुढे बिले थकित असल्यास अभियंत्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

दोन महिन्यांहून अधिक काळ बिल न भरलेल्यांची जोडणी त्वरित तोडण्याचे निर्देश साहाय्यक आणि कनिष्ठ अभियंत्यांना दिले आहेत. एप्रिलपासून ही प्रणाली सुरू केली जाईल, अशी माहिती साबांखा मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात बिले थकित ठेवण्याचे प्रकार घडत आहे. एप्रिलपासून ही प्रणाली सुरू झाल्यानंतर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांमध्ये कितीजणांची बिल न भरलेल्यांची जोडणी तोडली गेली, याची आकडेवारी अभियंत्यांकडून घेतली जाईल.

आपले काम योग्यरित्या न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. त्यांचे वेतन कपात करून बढतीवर देखील परिणाम होईल, प्रभावित होणार. त्यासाठी नियमितपणे बिल भरली जाईल याची खात्री करून घेण्याची जबाबदारी अभियंत्यांना दिली आहे, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.

थकबाकीदारांकडे लक्ष

16 हजार लीटर पाणी मोफत देण्याची योजना सुरू आहे. ज्यांनी पूर्वीची बिले भरलेली नाही, त्यांना थकबाकी रककेसहित बिले आली आहेत. काहींना आलेली चुकीची बिले दुरूस्त केली जातील.

परंतु थकबाकी न भरणाऱ्यांवर आमचे लक्ष असल्याने दररोज निरीक्षण केले जात आहेत. त्यामुळे ज्यांची बिले थकबाकी आहे, त्यांनी स्वत:हून ओटीएस योजनेचा लाभ घ्यावा. जोडणी तोडण्याचा नियम सरकारी कार्यालयांवर देखील लागू होणार आहे, असे काब्राल म्हणाले.

"बिल थकबाकी ठेवल्याने सत्तरीतील सुमारे 100 घरांची पाणी जोडणी तोडली आहे. सध्या प्रतिमाह 16 हजार लीटर पाणी मोफत दिले जात आहे. त्यामुळे बिलांमध्ये नक्की चूक झाल्याचे जाणवते. तसेच थकबाकी बिल भरण्यासाठी ओटीएस योजनेला 31 मार्चपर्यंत मुदतवाढ द्यावी."

- विश्‍वजीत राणे, नगर नियोजन मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT