Illegal Stay In Goa Dainik Gomantak
गोवा

Illegal Stay In Goa: बेकायदा वास्तव्याप्रकरणी नायजेरियन नागरिकास अटक

झडतीवेळी संशयिताकडे व्हिसा नसल्याचे आढळून आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Illegal Stay In Goa राज्यात बेकायदा वास्तव केल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी संशयित किंग्स्ले इचेझोना (32) या नायजेरियन नागरिकास अटक केली. मुड्डावाडा साळगाव येथे एक नायजेरियन नागरीक बेकायदेशीररित्या राज्यात वास्तव करीत असल्याची माहिती विश्वसनिय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने संशयिताच्या भाड्याच्या खोलीवर छापा टाकून त्याला पकडले.

झडतीवेळी संशयिताकडे व्हिसा नसल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी संशयिताला राज्यात बेकायदेशीररित्या वास्तव केल्याच्या देशी विदेशी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यास अटक केली. संशयित किंग्स्ले इचेझोना यांच्याविरोधात ड्रग्ससंदर्भांतील दोन, फसवणूकीचा आणि बनावटगिरी, असे एकूण चार गुन्हे विविध पोलीस स्थानकात नोंद आहेत.

पोलीस निरीक्षक मिलिंद भईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नवनीत गोलतेकर, निलम गावस, कॉन्स्टेबल सर्वेश गावस, वैभव आरोंदेकर व योगेश तारी या पथकाने ही कामगिरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chicken Price Hike: भर उन्हाळ्यात ब्रॉयलर चिकनचे दर 'भडकले', किलोमागे 30 रुपयांनी वाढ; तरीही मागणी

खरी कुजबुज: शिवसेना वाटणार छत्र्या!

Goa Murder Case: बोटमालकाच्या खूनप्रकरणी दोन मजुरांना अटक, आगशी पोलिसांकडून चौकशी सुरू; खुनामागील कारण अजूनही अस्पष्ट

खुशखबर! राज्याच्या नद्यांतील प्रदूषण घटले, केवळ दोनच प्रदूषित नदीपट्टे; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सादरीकरण

Monsoon Update: मान्सून रविवारपर्यंत गोव्यात! केरळमध्‍ये झाले आगमन; पुढील चार दिवस 'यलो अलर्ट' जारी

SCROLL FOR NEXT