Sand Mining Dainik Gomantak
गोवा

Sand Mining: वाळू उपसा प्रश्‍न! जीसीझेडएमएला 50 हजारांचा दंड; उत्तर सादर न केल्याने एनजीटीची कारवाई

Goa Sand Mining Case: ''गोवा रिव्हर सँड प्रोटेक्शन नेटवर्क'' या संस्थेने गोव्यातील विविध वाळू उपसा प्रकल्पांना दिलेल्या पर्यावरण परवानगी विरोधात १२ याचिका दाखल केल्या आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात नदीत असलेली वाळू उपशासाठी देण्यात आलेल्या पर्यावरणविषयक परवानगीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर उत्तर सादर करण्यास वारंवार विलंब लावल्याबद्दल ''राष्ट्रीय हरित लवादाने'' (एनजीटी) गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाला (जीसीझेडमएमए) ५०,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंह आणि तज्ज्ञ सदस्य डॉ. सुजित कुमार बाजपेयी यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.

''गोवा रिव्हर सँड प्रोटेक्शन नेटवर्क'' या संस्थेने गोव्यातील विविध वाळू उपसा प्रकल्पांना दिलेल्या पर्यावरण परवानगी विरोधात १२ याचिका दाखल केल्या आहेत. या प्रकरणांमध्ये जीसीझेडमएमएकडून प्रतिज्ञापत्र सादर होणे अपेक्षित होते.

यापूर्वी १३ ऑगस्ट २०२५ आणि त्यानंतरही वेळ देऊनही प्राधिकरणाने उत्तर दाखल केले नाही. या निष्काळजीपणामुळे सुनावणीत अडथळा येत असल्याचे ताशेरे ओढत, न्यायाधिकरणाने प्राधिकरणाला एका आठवड्याच्या आत ही दंडाची रक्कम ''एनजीटी बार असोसिएशन''कडे जमा करण्याचे निर्देश दिले आहेत.

पर्यावरण प्राधिकरणाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, अर्जात सीआरझेड क्षेत्राबाबत विचारले असले तरी, प्राधिकरणाची पूर्वपरवानगी आवश्यक असल्याचे स्पष्ट नमूद नव्हते. मात्र, न्यायाधिकरणाने हा युक्तिवाद फेटाळून लावला. आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs NZ T20: 5व्या सामन्यापूर्वी मोठी बातमी! सॅमसनसाठी अखेरची संधी? वरुण चक्रवर्तीबाबतही संदिग्धता

Nayudy Trophy: 23 चौकार, 6 षटकार! गोव्याविरुद्ध दिवसात ठोकले द्विशतक; पंजाबचा धावांचा डोंगर

Goa Politics: खरी कुजबुज; गोविंद गेले कुठे?

Chimbel: चिंबलच्या आंदोलनकर्त्यांवर जमावबंदी का? पाटकर यांचा सवाल; भाजपविरोधात तक्रार न केल्यास घेराव घालण्याचा इशारा

Arvind Kejriwal: "गोव्यातील लोकांना आप हाच आधार ठरणार आहे", केजरीवालांचे प्रतिपादन Watch Video

SCROLL FOR NEXT