Zuari Inauguration Live Updates
Zuari Inauguration Live Updates  Dainik Gomantak
गोवा

Zuari Inauguration Live Updates : या पुलाचा अभिमान गोवेकरांना पुढील अनेक वर्षे राहील; केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी

दैनिक गोमन्तक

या पुलाचा अभिमान गोवेकरांना पुढील अनेक वर्षे राहील ः गडकरी

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, हा पुल जगातील सर्वात सुंदर पुलांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वखाली आम्ही ठरवले आहे की, २०२४ पुर्वी देशातील रस्ते अमेरिकेतील रस्त्यांपेक्षा चांगले असतील. गोव्याचेही इन्फ्रास्ट्रक्चर सुधारले पाहिजे. येणाऱ्या काळात गोवा प्रगतीशील, स्वयंपुर्ण होईल, असा विश्वास व्यक्त करतो. या पुलाचा खरोखर आनंद आणि अभिमान गोवेकरांना पुढील अनेक वर्षे राहिल.

Zuari Inauguration Live Updates

देशातील मोठा पुल असल्याचा अभिमान ः मुख्यमंत्री सावंत 

प्रमोद सावंत म्हणाले की, झुवारी पुल देशातील मोठा पुल असल्याचा आम्हाला अभिमान आहे. प्रत्येक व्यक्तीमागे गाड्यांच्या संख्येत 45 टक्के जास्त पूर्ण देशात गोवा हे पहिले राज्य आहे. त्यामुळे पत्रादेवी ते दोडामार्ग, केरी ते मोले, मोले ते पोळे हा पश्चिम घाटातून जाणारा विमानतळ, रेल्वेला जोडणारा सर्कूलर रोड मंजुर करुन द्या अशी विनंती करतो. बांबोळी ते वेर्णा काम चालू असताना 3 कामगारांचा मृत्यु झाला होता. त्या कामगारांच्या कुटुंबीयांना गोवा सरकारकडून 2 लाखांची मदत देण्यात येणार आहे. गोयकारांनी घरातील कचरा नदी किंवा इतरत्र ठिकाणी न टाकता कचरा कुंडीत टाकावा व स्वच्छ गोंय, सुंदर गोय, भांगराळ गोंय ही संकल्पना राबवूया, असे मुख्यमंत्री म्हणाले.

झुआरी पुलावर फिरते रेस्टॉरंट 100 टक्के होणार ः मुख्यमंत्री सावंत

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, मोदी है तौ मुमकीन है. नितीन गडकरींच्या सुपिक डोक्यातून या पुलावर दोन टॉवर उभारून त्यावर फिरते रेस्टॉरंट सुरू करण्याची कल्पना आली होती. याबाबत माजी मुख्यमंत्री मनोहरभाई पर्रीकर यांच्याशी गडकरींची चर्चा झाली होती. दिवंगत मनोहरभाईंचा प्रोजेक्ट आम्ही पुर्ण करणार. पुलावर फिरते रेस्टॉरंट 100 टक्के पुर्ण करणार, असे आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिले.

Zuari Inauguration Live Updates

गडकरीजी, पुलावर लाईट अँड साऊंड शो हवा ः मुख्यमंत्र्यांची मागणी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, देशातील सर्वात उत्तम लाईट अँड साऊंड शो जर कुठे असेल तर तो नितीन गडकरीजींच्या नागपुरात आहे. मी नुकताच नागपुरला जाऊन आलो तेव्हा तो शो पाहिला आहे. तितका चांगला नसला तरी चालेल पण, गडकरीजी या नवीन झुआरी पुलावरदेखील लाईट अँड साऊंड शो करून द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. पर्यटनासाठी त्याचा आम्हाला खूप फायदा होईल, सर्व गोयंकरांच्यावतीने मी ही विनंती करत आहे, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून मोदी, गडकरींचा जयघोष

यावेळी गोव्याला केलेल्या सहकार्यालाबद्दल व्यासपीठावरून बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यासपीठावरूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या. तसेच उपस्थितांना टाळ्या वाजवून आणि घोषणा देऊन गडकरींचे कौतूक करण्यास सांगितले. उपस्थितांनीही त्यांना दाद दिली.

Zuari Inauguration Live Updates

प्रमुख अभियंते, तंत्रज्ञांचा नितीन गडकरींच्या हस्ते सत्कार 

यावेळी या पुलाच्या उभारणीत योगदान दिलेल्या प्रमुख अभियंते, तंत्रज्ञांचा सत्कार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. उत्तम पार्सेकर, प्रशांत फेगडे, दत्तप्रसाद कामत, संजय अस्थाना, दिनेश गुप्ता, अतुल भोवे, अतुल जोशी यांचा सत्कार यावेळी झाला.

Zuari Inauguration Live Updates

PWD Goa अ‍ॅपचे नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण 

या कार्यक्रमात राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे PWD Goa या अ‍ॅपचे अनावरण करण्यात आले. हे अ‍ॅप गोवेकरांना डाऊनलोड करावे लागेल. याद्वारे रस्त्यातील खड्ड्यांची समस्या मिटविण्यात येणार आहे. गोवेकरांनी रस्त्यातील खड्ड्याचा फोटो या अ‍ॅपमध्ये अपलोड करावा लागेल. त्यानंतर संबंधित रस्त्याचा कंत्राटदार सर्व यंत्रणा कामाला लाऊन तो खड्डा मुजवेल आणि त्या मुजवलेल्या खड्ड्याचा फोटो त्याच अ‍ॅपमध्ये अपलोड करेल. त्यानंतर कंत्राटदाराने केलेल्या कामाचे मुल्यमापन इंजिनियरमार्फत करण्यात येईल. अशा रितीने रस्त्यातील खड्ड्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय केला जाणार आहे.

Zuari Inauguration Live Updates

गोव्याची पारंपरिक शाल देऊन नितीन गडकरींचे स्वागत 

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याची ओळख असलेली पारंपरिक शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे स्वागत केले. मुख्यमंत्र्यांसह इतर मान्यवरांचे स्वागत फळांची टोकरी देऊन करण्यात आले.

स्वागतगीताने उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ 

संजीवन संगीत अकादमीच्या युवक-युवतींनी सादर केलेल्या स्वागत गीताने या नवीन झुआरी पुलाच्या उद्घाटन कार्यक्रमाला सुरवात.

Zuari Inauguration Live Updates

नितीन गडकरी यांनी फित कापून केले कार्यक्रमाचे उद्घाटन 

केंद्रीय वाहतूक मंत्री यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यावर त्यांच्या हस्ते कमानीजवळ फित कापून या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तिरंगी रंगातले फुगे हवेत सोडण्यात आले. यावेळी राज्यपाल श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल आदींसह इतर मंत्री, आमदार, नागरिक उपस्थित आहेत.

गोव्याचे 'मनोहारी' स्वप्न सत्यात

उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या जिल्ह्यांना जोडणाऱ्या नवीन झुआरी पुलाचे आज गुरूवारी 29 डिसेंबर रोजी सायंकाळी उद्घाटन होत आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होत आहे. 

Nitin Gadkari

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT