Pre Monsoon Preparedness. Dainik Gomantak
गोवा

Mapusa: म्हापशात 49 इमारती धोकादायक! 42 खासगी, 7 शासकीय; प्रशासनाकडून प्रत्यक्ष तपासणी मोहीम

Pre Monsoon Preparedness: म्हापसा नगरपालिकेने शहरात सुमारे ४२ धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची ओळख पटवली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: पावसाळ्याचे आगमन जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर म्हापसा येथील असुरक्षित आणि धोकादायक इमारतींची पुनर्तपासणी मोहीम गुरुवारी बार्देशच्या उपजिल्हाधिकारी वर्षा परब यांच्यासह म्हापसा नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे राबवली.पावसाळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून आणि संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत असलेल्या इमारतींमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार ही तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती.

या मोहिमेदरम्यान, तपासणी पथकाने असुरक्षित आणि धोकादायक म्हणून घोषित केलेल्या अनेक शासकीय तसेच खासगी इमारतींना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्या सद्यस्थितीचा आणि संरचनात्मक स्थिरतेचा (स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी) आढावा घेतला.

याबाबत माहिती देताना बार्देशच्या उपजिल्हाधिकारी वर्षा परब म्हणाल्या, असुरक्षित म्हणून चिन्हांकित करण्यात आलेल्या इमारतींच्या संरचनात्मक स्थिरतेची तपासणी करण्यासाठी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व कारवाई करण्याच्या उद्देशाने आम्ही म्हापशात ही पुनर्तपासणी मोहीम राबवत आहोत. म्हापसा नगरपालिकेने निश्चित केलेल्या खासगी इमारतींचा तसेच पीडब्ल्यूडी इमारत विभागाने चिन्हांकित केलेल्या शासकीय इमारतींचा या तपासणीत समावेश असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

इमारत खाली करण्याच्या लवकरच नोटिसा

मिळालेल्या माहितीनुसार, म्हापसा नगरपालिकेने शहरात सुमारे ४२ धोकादायक आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची ओळख पटवली आहे. सध्या वापरात असलेल्या किंवा लोक राहत असलेल्या धोकादायक इमारतींच्या मालकांना जागा रिकामी करण्याबाबत नोटिसा बजावण्याची प्रक्रिया पालिकेकडून सुरू आहे.

इमारत मालकांना उपाययोजनांचे निर्देश

शहरातील असुरक्षित व धोकादायक असलेल्या इमारतींच्या मालकांना आवश्यक त्या सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत विभागानेही सुमारे ६ ते ७ असुरक्षित इमारती शोधून काढल्या असून यात प्रामुख्याने जुन्या शासकीय निवासी क्वार्टर्सचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT