Mhapsa: मार्केट आहे की कचरा डेपो?

Mhapsa: सर्वत्र दुर्गंधी: नगराध्‍यक्षांचे कामगारांकडे बोट; बेजबाबदारपणा वाढल्‍याचा आरोप
Mhapsa Market
Mhapsa MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Mhapsa: म्हापसा शहरात कचऱ्याच्‍या राशी साचल्‍या असून, सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्‍हणजे प्रत्‍येक दिवशी हा कचरा कमी होण्‍याऐवजी वाढतच चालला आहे. काही लोक आपल्‍या घरातील कचरा आणि टाकाऊ खाद्यपदार्थ प्लास्टिकच्या पिशवीत भरून आणतात आणि या कचऱ्यात टाकतात. त्‍यामुळे भटकी गुरे, कुत्री तेथे घोळक्याने जमा होऊन कचरा रस्‍त्‍यावर आणतात.

दुसरीकडे म्हापसा पालिका भाजी मार्केटच्या बाहेर भाजीविक्रेते कुजलेली भाजी फेकूत देतात. दुपारी 12 वाजेपर्यंत कामगारांकडून त्‍याची उचल होत नाही. परिणामी या परिसराला ओंगळवाणे स्‍वरूप प्राप्‍त झालेले आहे.सकाळी सात वाजल्‍यापासून म्‍हापसा बाजारात मासळीविक्रेते मोठ्या प्रमाणात येतात. त्यावेळी भाजी मार्केटच्या बाहेर भाजीचा ढीग दिसून येतो.

तेथे बाजूलाच विक्रेते आपला व्यापार घेऊन बसतात व तो खरेदी करण्यासाठी ग्राहकही उपस्थित असतात. त्याचप्रमाणे म्हापसा पालिका क्षेत्रातील सर्व वीसही प्रभागांमध्ये रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिग दिसून येतात. त्‍यामुळे प्रत्येक ठिकाणी परिसर विद्रूप बनला असून, दुर्गंधी पसरली आहे. म्हापसा पालिकेचे कामगार कचऱ्याची उचल वेळेवर करत नसल्याने हा कचरा वाढत जातो.

चार दिवसांपूर्वी एक ट्रक सेंट झेवियर कॉलेजच्या चढतीवर बंद पडला होता. कचऱ्याने भरलेला हा ट्रक दोन दिवस त्याच ठिकाणी उभा होता. परिणामी त्‍यातील कचरा कुजला आणि तेथून येजा करणाऱ्या लोकांना नाहक मन:स्‍ताप सहन करावा लागला.

शिवाय दोन दिवस वाहतुकीची कोंडीही झाली. हा कचरा दुसऱ्या ट्रकमध्ये घालून नेता आला असता पण आमच्‍या कामगारांनी ते सौजन्‍य दाखविले नाही, अशी खंतही वायंगणकर यांनी व्‍यक्त केली.

Mhapsa Market
Cortalim: कुठ्ठाळी फेरी पॉईंटजवळ ‘जेटी’ला पंचायतीचा विरोध

नगराध्यक्ष वायंगणकर यांनी सांगितले की, म्‍हापसा पालिका कर्मचाऱ्यांना महिन्‍याकाठी 50 ते 60 हजार रुपये पगार दिला जातो. परंतु त्‍यांच्‍याकडून कामे मात्र वेळेवर होत नाहीत. काही ट्रकचालक तर एवढी हुशारी दाखवितात की कचरा भरावा लागतो म्‍हणून ट्रकच नादुरुस्‍त करून म्‍हणजे मोडून ठेवतात.

जर या कामगारांनी कचऱ्याची उचल वेळेवर केली असती तर म्हापसा नगरपालिका क्षेत्रातील वीसही प्रभागांत आजची स्‍थिती दिसली नसती. भटकी गुरे आणि कुत्री या कचऱ्यातील खाद्यपदार्थांवर ताव मारतात आणि तो कचरा रस्‍त्‍यावर आणतात. त्‍यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरते. पालिकेकडे सुमारे दीडशे कामगार असून ते दिवसभर कुठे काय करतात हे काणालाच कळत नाही, असे हताश उद्‌गारही त्‍यांनी काढले.

म्हापसा पालिका कामगारांकडून कचऱ्याची उचल वेळेवर होत नसल्याने लोकांकडून आम्हाला विचारणा केली जाते. आमच्याकडे कचरावाहू दहा ट्रक आहेत, पण अधूनमधून ते बंद पडतात. त्‍यास ट्रकचालकच कारणीभूत आहेत. कामचुकारपणा करण्‍यासाठी त्‍यांच्‍याकडून या ट्रकांची जाणूनबुजून मोडतोड करण्‍यात येते. - शुभांगी वायंगणकर, म्‍हापसा नगराध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com