Hankhane Power Supply Sabotage Dainik Gomantak
गोवा

Electricity Department: काठी फेकून खंडित केला वीजपुरवठा! हणखणेतील धक्कादायक प्रकारामुळे नागरिक, व्यावसायिक हैराण

Hankhane Power Supply Sabotage: हणखणे येथील झारापकर रबर प्लांटेशनजवळ वीज तारेवर काठी फेकून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

मोरजी: हणखणे येथील झारापकर रबर प्लांटेशनजवळ वीज तारेवर काठी फेकून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे हणखणे परिसरातील नागरिकांना बराच वेळ अंधाराचा सामना करावा लागला, तर व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दोष शोधून तो दुरुस्त करण्यासाठी पेडणे येथून विद्युत खात्याच्या कर्मचाऱ्यांना तब्बल २० ते २५ किलोमीटर अंतर पार करून घटनास्थळी जावे लागले. अखेर त्यांनी मेहनत घेऊन वीजप्रवाह पूर्ववत केला. मात्र, अशा प्रकारामुळे कर्मचाऱ्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. या अचानक खंडित झालेल्या वीजेमुळे इब्रामपूर-हणखणे ग्रामपंचायत क्षेत्रातील छोटे-मोठे व्यवसाय ठप्प झाले. हॉटेल्ससह विविध व्यावसायिक आस्थापनांचे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, हा प्रकार रात्रीच्या वेळी मुद्दाम घडवून आणला असावा, अशी शक्यता व्यक्त होत आहे. अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून असे दुष्कृत्य करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, संबंधिताचा शोध घेण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. एका अज्ञात व्यक्तीने हणखणे येथील वीज तांरावर अशी बांबूची काठी फेकून वीज प्रवाह खंडित केला आहे. या प्रकाराबद्दल परिसरात संताप व्यक्त केल्या जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT