investors cheated with promise of high returns Dainik Gomantak
गोवा

Goa Investment Fraud: अधिक परताव्‍याच्‍या आमिषाने 7.36 कोटींचा गंडा; दुबईतील सूत्रधारासह दहाजणांविरुद्ध गुन्हा नोंद

Goa Fraud Case: क्रिप्टोकरन्सी आणि अधिक परताव्याच्या गुंतवणूक योजनांच्या नावाखाली तब्बल ७ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या सायबर आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: क्रिप्टोकरन्सी आणि अधिक परताव्याच्या गुंतवणूक योजनांच्या नावाखाली तब्बल ७ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोठ्या सायबर आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. डिचोली येथील ४० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी १८ एप्रिल रोजी पणजी येथील आर्थिक गुन्हे शाखा पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणातील मुख्य संशयित लविश चौधरी ऊर्फ नवाब अली हा सध्या दुबई येथे वास्तव्यास आहे. त्याच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, लविश चौधरी याने बॉटब्रो, क्यूएफएक्स ट्रेड लिमिटेड, यॉर्कर कॅपिटल मार्केट्स, बॉटअल्फा, क्रॉसमार्केट्स आणि मायनक्रिप्टोज अशा बोगस कंपन्या स्थापन करून स्वतःला त्यांचा संस्थापक म्हणून सादर केले होते. इतर संशयित गोव्यात या कंपन्यांचे प्रवर्तक म्हणून काम करत असल्याचे भासवत होते.

या टोळीने गोव्यातील अनेकांना क्रिप्टोकरन्सी आणि अन्य ऑनलाईन योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस परतावा मिळेल, असे आमिष दाखवून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१४, ३१६(२), ३१६(५), ३१८(४), ३१९(२), ३२०, ३३६(२), ३४०(२), ६१(२) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवाय ‘गोवा ठेवीदार हितसंबंधांचे संरक्षण (वित्तीय संस्था) कायदा १९९९’च्या कलम ३ व ५ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(डी) अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण घोटाळ्यात ७ कोटी ३६ लाख ५७ हजार १६० रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रमेश शिरोडकर पुढील तपास करत आहेत.

गुन्हा दाखल झालेले संशयित

लविश चौधरी ऊर्फ नवाब अली (दुबई/उत्तर प्रदेश), संजीव कुमार (दुबई/उत्तर प्रदेश), ब्रिजेश कुमार (दुबई/उत्तर प्रदेश), विजय नायडू (महाराष्ट्र), उदय सिनारी (डिचोली), नीलेश नाईक (बोर्डे-डिचोली), आशुतोष नाईक (पर्वरी), सूरज कांदे (पणजी), विजयकांत नार्वेकर (माशेल), साईश नार्वेकर (माशेल).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT