Goa High Court hearing in Luthra bail challenge case Dainik Gomantak
गोवा

Goa Luthra Case: लुथरांच्या जामिनाला सरकारकडून आव्हान; बर्चप्रकरणी खंडपीठात धाव: अजय गुप्तालाही नोटीस, 15 रोजी सुनावणी

Night Club Fire: हडफडे येथील प्रसिद्ध ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: हडफडे येथील प्रसिद्ध ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि नाईट क्लबचे संचालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा आणि अजय गुप्ता यांना म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने मंजूर केलेला जामीन रद्द करण्यासाठी सरकारने गोवा खंडपीठात धाव घेतली आहे.

सरकारने या जामीन आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल केल्या असून उच्च न्यायालयाने तिन्ही आरोपींना नोटीस बजावली आहे. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी ठेवण्यात आली आहे. हणजूण पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीवेळी सरकारतर्फे न्यायालयात हा गुन्हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. २५ निष्पाप नागरिकांचा बळी गेलेल्या दुर्घटनेतील मुख्य आरोपींना जामीन देणे अयोग्य असल्याचे सरकारने म्हटले आहे.

याशिवाय, अबकारी परवाना मिळवण्यासाठी म्हापसा पोलिसांच्या हद्दीतील बनावट ना-हरकत प्रमाणपत्र सादर केल्याचा आणखी एक गुन्हा या तिघांविरुद्ध दाखल आहे. या बनावट दस्तऐवज प्रकरणात लुथरा बंधूंना मिळालेला जामीन रद्द करण्यासाठी सरकार स्वतंत्र याचिका दाखल करणार असल्याचेही न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.

याच गुन्ह्यात अजय गुप्ता याला मंजूर झालेल्या जामिनाविरोधातील याचिकेची सुनावणीदेखील १५ जून रोजी होणार आहे. दरम्यान, हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाईट क्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ च्या मध्यरात्री भीषण आग लागली होती. प्राथमिक तपासात अंतर्गत सजावटीसाठी चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आलेल्या इलेक्ट्रिक फटाक्यांमुळे काही सेकंदांत आग संपूर्ण क्लबमध्ये पसरल्याचे समोर आले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT