Belagavi youth Mandovi river death Dainik Gomantak
गोवा

Goa Drowning Death: काकांसोबतची ती सहल ठरली अखेरची! बेळगावच्या 22 वर्षीय तरुणाचा मांडवी नदीत बुडून मृत्यू

Belagavi youth Mandovi river death: मांडवी नदीच्या पात्रात पडून बेळगावमधील एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

पणजी: मांडवी नदीच्या पात्रात पडून बेळगावमधील एका २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या या तरुणाचा मृतदेह शनिवारी पहाटे मालिम जेटी (Malim Jetty) जवळ तरंगताना आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृताची ओळख

मारुती संकन्नावर (वय २२) असे या मृत तरुणाचे नाव आहे. मारुती हा मूळचा कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील रहिवासी होता, मात्र सध्या तो पोरवरी येथील मालइम परिसरात वास्तव्यास होता. कामाच्या निमित्ताने तो आपल्या नातेवाईकांसोबत गोव्यात राहत होता.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी मारुती आपल्या काकांसोबत मालिमजेटी परिसरात गेला होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, जेटीवर असताना मारुतीला अचानक झटका आला. या झटक्यामुळे त्याचा स्वतःवरील ताबा सुटला आणि तो थेट मांडवी नदीच्या खोल पात्रात कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याच्या काकांना आणि परिसरातील लोकांना काही समजण्यापूर्वीच तो पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाला.

शोधमोहीम आणि मृतदेह हाती

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि अंधारामुळे शोध घेण्यास अडथळे येत होते. अखेर शनिवारी पहाटेच्या सुमारास काही स्थानिकांना जेटीच्या जवळच एक मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला, ज्याची ओळख मारुती संकन्नावर म्हणून पटली आहे.

पर्वरी पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तो नातेवाईकांच्या स्वाधीन केला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT