Tourist Death Goa: गोव्याची ट्रीप ठरली शेवटची! हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पाय घसरला अन् घात झाला; केरळच्या पर्यटकाचा दुर्दैवी मृत्यू

Kerala tourist death Goa: निसर्गरम्य किनारे आणि सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात आलेल्या एका पर्यटकावर काळानं घाला घातला आहे.
Kerala Tourist Death Goa
Kerala Tourist Death GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: निसर्गरम्य किनारे आणि सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात आलेल्या एका पर्यटकावर काळानं घाला घातला आहे. उत्तर गोव्यातील सांगोल्डा येथील एका हॉटेलमध्ये स्विमिंग पूलमध्ये अंघोळ करताना पाय घसरून पडल्यानं केरळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय.

नेमकं प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, केरळ राज्यातील पर्यटकांचा एक गट शुक्रवारी दुपारी गोव्यात दाखल झाला होता. या सर्वांनी सांगोल्डा येथील एका नामांकित हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला होता. प्रवासाचा थकवा घालवण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी संबंधित पर्यटक आपल्या मित्रांसह हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये उतरला होता. मात्र, पूलमध्ये वावरत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो जोरात खाली पडला.

Kerala Tourist Death Goa
Jobs In Goa: गोमंतकीयांसाठी सुवर्णसंधी! राज्यात 769 सरकारी पदांसाठी होणार भरती; कसा कराल अर्ज? जाणून घ्या..

पाय घसरल्यामुळे या पर्यटकाचं डोकं स्विमिंग पूलच्या काठावरील फरशीला (टाईल्स) जोरात धडकलं. यात तो गंभीर जखमी झाला आणि जागीच बेशुद्ध पडला. घटनेचं गांभीर्य ओळखून त्याच्या मित्रांनी आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. प्राथमिक उपचारानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Kerala Tourist Death Goa
Chandranath Hill Goa History: हिमालयापेक्षाही प्राचीन; गोव्यातील 'चंद्रनाथ पर्वता'चा विस्मयकारक इतिहास आणि चंद्रेश्वराचा वारसा!

पोलीस तपास सुरू

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या संबंधित पर्यटकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) येथे पाठवण्यात आला आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत. प्राथमिक अंदाजानुसार, ओल्या फरशीवरून तोल गेल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेमुळं त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सोबत असलेल्या मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com