Baina Sewage Pump Failure Dainik Gomantak
गोवा

Vasco Drainage Overflow: बायणा पंपिंग स्टेशनचा पंप पडला बंद; सांडपाणी गटारातून वाहू लागले, नाला दुरुस्तीच्या कामातही अडथळा

Baina Sewage Pump Failure: बायणा येथील भू-गटार पंपिंग स्टेशनमधील एक पंप पुन्हा नादुरुस्त झाल्याने सांडपाणी आसपासच्या गटारातून वाहू लागले असून परिसरात पुन्हा अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: बायणा येथील भू-गटार पंपिंग स्टेशनमधील एक पंप पुन्हा नादुरुस्त झाल्याने सांडपाणी आसपासच्या गटारातून वाहू लागले असून परिसरात पुन्हा अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. सांडपाणी जवळच्या नाल्यात जमा झाल्याने सुरू असलेल्या नाला दुरुस्तीच्या कामातही मोठा अडथळा निर्माण झाला आहे. या पंपिंग स्टेशनातील पंप जुने आणि जीर्ण झाल्याने ते वारंवार बंद पडत असल्याची समस्या कायम आहे.

दोन महिन्यांपूर्वीही एक पंप नादुरुस्त झाल्याने सांडपाणी उपसण्याचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यावेळी चार दिवसांनंतर पंप दुरुस्त करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा तीच समस्या उभी ठाकली आहे. दोन दिवसांपूर्वी कार्यरत असलेल्या दोन पंपांपैकी एक बंद पडल्याने सांडपाणी उपसण्यास अडथळा निर्माण झाला आणि अखेर ते गटारात सोडावे लागले.

परिणामी हे सांडपाणी सासमोळे येथील नाल्यात जमा झाले. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून संबंधित खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देत कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

नागरिकांतून संताप व्यक्त

पंपिंग स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या सासमोळे-बायणा भागात सध्या नाला दुरुस्तीचे काम सुरू आहे. पंप बंद पडल्यामुळे गटारातील सांडपाणी थेट नाल्यात सोडण्यात आले. त्यामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला असून काही राहिवाशांच्या घरांच्या दारापर्यंत सांडपाणी पोहोचल्याने संताप व्यक्त होत आहे.

बायणा पंपिंग स्टेशनमध्ये इतर भागांतील सांडपाणी जमा होते आणि तेथून काटे-बायणा येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाकडे वाहिन्यांद्वारे पाठवले जाते. स्टेशनमध्ये चार पंप असले तरी त्यापैकी दोन पंप दुरुस्तीच्या पलीकडे गेले आहेत. उर्वरित दोन पंपांवरच संपूर्ण भार येत असल्याने ते वारंवार नादुरुस्त होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT