prakash kandolkar Arrested Dainik Gomantak
गोवा

Goa Economic Frauds: 'अष्टगंधा'मध्‍ये 11 कोटींचा घोटाळा; प्रकाश कांदोळकर अटकेत, आकर्षक परताव्यांचे आमिष

prakash kandolkar Arrested: सामान्य ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ‘अष्टगंधा’ अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीविरोधातील कारवाईला वेग दिला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: सामान्य ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या कथित अपहारप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने ‘अष्टगंधा’ अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीविरोधातील कारवाईला वेग दिला आहे. या प्रकरणात वायडोंगर-पार्से येथील प्रकाश कांदोळकर याला अटक करण्यात आली असून, तब्बल ११ कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराला नवे वळण मिळाले आहे.

पर्वरी येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल गुन्हा क्रमांक ०४/२०२४ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. ठेवीदारांना आकर्षक परताव्यांचे आमिष दाखवून जमा झालेल्या कोट्यवधी रुपयांचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. अनेक नागरिकांनी आयुष्यभराची बचत या पतसंस्थेत गुंतविली होती; मात्र आता त्यांनाच आपल्या पैशांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

विशेष म्हणजे अटकेपूर्वी संशयिताने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने थेट त्याच्या निवासस्थानी छापा टाकून अटक केली. न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, सरकारने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष मंगेश फडते यांनी सहकार निबंधकांकडे दिलेल्या तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने २६ डिसेंबर २०२४ रोजी माजी संचालक, पदाधिकारी आणि संबंधित अशा ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तक्रारीनुसार, संबंधितांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे खोटे कर्जप्रकरणे तयार केली, कार्यक्षेत्राबाहेरील आणि बिगर सदस्यांशी व्यवहार केले तसेच सोसायटीच्या निधीतून बेकायदेशीररीत्या पैसे काढले. काही निधी वैयक्तिक खात्यांमध्ये वळविल्याचाही आरोप आहे. या गैरव्यवहारामुळे सुमारे ११ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक परेश रामनाथकर करीत आहेत.

या घडामोडींनंतर आमदार बोरकर यांनी मौन बाळगले असून, त्‍यांनी दिल्ली गाठलेली आहे. मनोज परब गटाकडून अजूनही वीरेश पक्ष स्‍वत:च्‍या ताब्‍यात घेण्‍याच्‍या प्रयत्‍नात असल्‍याचे म्‍हटले जात आहे. दुसरीकडे ते काँग्रेसच्‍या वाटेवर असल्‍याचे बोलले जात आहे. परंतु, आपण ‘आरजी’पासून दूर गेलो नसल्‍याचा दावा बोरकर यांच्‍याकडून केला जात आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या दिल्ली दौऱ्याबाबत कार्यकर्त्यांत अनेक प्रश्‍‍न उपस्‍थित झाले आहेत.

११ जणांविरोधात गुन्हा

या प्रकरणात रवींद्र आर. नाईक, दिगंबर पी. परब, मोहनदास जी. एस. देसाई, श्रद्धा आर. नाईक, प्रकाश एल. नाईक, प्रकाश व्ही. नाईक, प्रकाश ए. नाईक, कृष्णा बी. हळर्णकर, चंद्रशेखर के. बर्वे आणि भरत के. परब यांच्यासह अन्य काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांनी बनावट कागदपत्रे तयार करून खोट्या कर्जप्रकरणांद्वारे निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party Founder: 'कॉकरोच जनता पार्टी'चा संस्थापक अभिजीत दीपके कोण आहे? केजरीवाल कनेक्शन काय? जाणून घ्या

खरी कुजबूज: वीरेश दिल्लीत, कार्यकर्त्यांत खळबळ

Bicholim Market: डिचोली बाजारात आकर्षक रेनकोट, छत्र्या उपलब्ध; 15 टक्के दर वाढले, तरीही खरेदी उत्साहात सुरू

Labh Drishti Yog 2026: मंगळ-गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी योग'! 3 राशींचे लोक होणार मालामाल; नोकरीत मिळणार मोठी पगारवाढ

Viral Post: 'कंजूष' कंपनीची करामत!पगारवाढीच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना दिलं 1 लीटर पाणी अन् बिस्किट! पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT