आंतोन वाझ आणि विरेश बोरकर  Dainik Gomantak
गोवा

गोव्याच्या नवनिर्वाचित आमदारांची दुचाकीवरुन विधानसभेत एन्ट्री

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सर्वप्रथम शपथ घेतली तर डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मराठीतून शपथ घेतली.

दैनिक गोमन्तक

गोवा: राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या; या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष तब्बल 20 जागांनी निवडून आला आहे. दरम्यान आज आमदारांचा शपथविधी पार पडणार असुन, कुठ्ठाळीचे आमदार आंतोन वाझ थेट स्कुटरवरुन विधानसभेत आले, तर काही वेळापुर्वी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे आमदार विरेश बोरकर हे मनोज परब यांच्यासोबत बुलेटवरुन विधानसभेत दाखल झाले. (Newly elected MLAs of Goa enter the Legislative Assembly on two-wheelers)

हंगामी सभापती गणेश गावकर यांच्याकडून नवनिर्वाचित आमदारांना (MLA) शपथ देण्यास सुरुवात झाली आहे. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी सर्वप्रथम शपथ घेतली तर डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी मराठीतून शपथ घेतली.

गोव्यात निवडून आलेले 30 आमदार कोट्यधीश

गोव्याच्या (Goa) आंतोन वाझ आणि विरेश बोरकर या दोन अमदारांनी दुचाकी वरून रॉयल एन्ट्री केली आहे. 40 पैकी एक आमदार केवळ 8 वी पास असून प्रत्येकी सहा आमदारांनी दहावी वबारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 13 जण पदवीधर असून अन्य 6 जणांकडे व्यावसायिक शाखेतली पदवी आहे. 6 जणांकडे पदविका तर चौघे पदव्युत्तर पदवीधारक आहेत.

40 आमदारांत केवळ एक तिशीच्या आतला आहे. 31 ते 40 या वयोगटातील तिघे आमदार नव्या विधानसभेत (Goa Assembly) असतील. एकूण 16 जणांचा वयोगट 41 ते 50 असून 12 जण 51 ते 60 वयोगटांतले आहेत. साठी ओलांडलेले 8 आमदार असून त्यातील एक तर सत्तरी पार केलेला आहे. गोव्याने निवडून दिलेले 30 आमदार कोट्यधीश आहेत, या 30 पैकी 22 जणांची मालमत्ता 10 कोटी रुपयांहून अधिक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT