P. S. Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई गोव्यात दाखल !

गोव्याचे (Goa) नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) गोव्यात आज दाबोळी विमानतळावर (Daboli Airport) दुपारी दाखल झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

गोव्याचे (Goa) नवनिर्वाचित राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan Pillai) गोव्यात आज दाबोळी विमानतळावर (Daboli Airport) दुपारी दाखल झाले आहेत. दाबोळी विमानतळावर त्यांचं आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी राज्यपालांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, मंत्री मॉविन गुदिन्हो, सभापती राजेश पाटणेकर उपस्थित होते. १५ जुलै रोजी सायंकाळी पिल्लई राज्याचे नवे राज्यपाल म्हणून शपथ घेणार आहेत.

गोव्याच्या राज्यपालपदी श्रीधरण यांची नियुक्ती करण्यात आली आहे मंगळवारी राष्ट्रपती कडून त्यासंबंधी घोषणा करण्यात आली आहे. यापुर्वी गोव्याच्या राज्यपालपदी भगतसिंग कोशारी होते. गोव्यासह कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश झारखंड, त्रिपुरा, हरियाणा आणि मिझोराम या आठ राज्यासाठी राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या नियुक्तीची अधिकृत घोषणा गेल्या मंगळवारी केली होती.

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांची गेल्या ६ जुलै रोजी मिझोरममधून गोव्यात बदली झाली. लवकरच आपण गोव्याच्या राज्यपालपदाचा ताबा घेणार असल्याचे त्यांनी त्याच दिवशी सांगितलं होतं. त्यानुसार पिल्लई १५ जुलै रोजी सायंकाळी राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत. राजभवनावर आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती त्यांना शपथ देतील, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पी. एस. श्रीधरन पिल्लई हे एक भारतीय राजकारणी, वकील आणि लेखक आहेत. गोव्याच्या राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते मिझोराम राज्याचे १५ वे राज्यपाल म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी ते केरळ राज्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

Farmagudi Accident: फार्मागुडी येथे कार आणि दुचाकीचा अपघात, महिला जखमी

Horoscope: आठवडा विशेष: चंद्र राशीनुसार 'प्रेमसंबंध, आरोग्य आणि आर्थिक' स्थिती कशी राहील? सर्व 12 राशींचं भविष्य वाचा

SCROLL FOR NEXT