Drowning Dainik Gomantak
गोवा

वर्षाचा शेवटचा दिवस आयुष्याचाही शेवटचा ठरला; गोव्याच्या समुद्रात बिहारचा एक पर्यटक बुडाला, दुसरा जखमी

Goa sea drowning incident: दोघांना उपचारासाठी तुये रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे आदित्य नारायण याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.

Pramod Yadav

पणजी: सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक गोव्यात दाखल होत असतात. यावर्षी नववर्षाच्या पूर्वसंध्येला पर्यटकांच्या जल्लोषाला गालबोट लागणारी घटना घडली. मोरजी समुद्रकिनाऱ्यावर बिहारचे दोन पर्यटक बुडाले. यापैकी एकाचा मृत्यू झाला असून, दुसरा जखमी झाला आहे.

आदित्य नारायण (वय २६, रा. बिहार) असे बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर, आदित्यराज (२५) असे या दुर्घटनेत जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मोरजी समुद्रकिनाऱ्यावर बुधवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. दोघांनी जीवरक्षकांनी दिलेल्या सुचनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे.

सायंकाळी पर्यटकांनी समुद्रातून बाहेर पडण्याची सूचना करण्यात आली होती. पण, अनेकांनी या सुचनांकडे दुर्लक्ष केले, अशी माहिती आहे. दोन्ही तरुण पाण्यात असताना बुडू लागले, जीवरक्षकांनी दोघांना बाहेर काढले पण, त्यांच्या पोटात पाणी गेल्याने ते बेशुद्ध पडले होते. दोघांना प्रथमोपचार देण्यात आला.

दोघांना उपचारासाठी तुये रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे आदित्य नारायण याचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तर, आदित्यराजला उपचारासाठी सुरुवातीला म्हापसा व नंतर गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या घटनेचा पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT