

हरमल: पर्यटन खाते व पर्यटन विकास महामंडळाने रापोणकर सी फूड फेस्टीव्हल व ख्रिसमस फिएस्टाचे आयोजन करून मच्छीमारबांधवांच्या पारंपरिक व्यवसाय जागतिक नकाशावर आणला आहे. आता सीआरझेडमधील घरे कायदेशीर करून मच्छीमाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मच्छीमार आयकॉन पेले फर्नांडिस यांनी केली.
हरमल समुद्र किनाऱ्यानजीकच्या मैदानावर आयोजित सी फूड फेस्टिव्हलच्या समारोप कार्यक्रमात फर्नांडिस बोलत होते. गोव्यात प्रत्येक दिवस सुंदर हा असतो, असे सांगून त्यांनी प्रेक्षकांना रिझवले. सी फूड फेस्टिव्हलचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री व मांद्रेचे आमदार यांचे आभार मानले.
किनारी भागात पारंपरिक मच्छीमारबांधवांची घरे २०२७ पूर्वी कायदेशीर करून द्यावी. तसेच त्यांना गेस्ट हाऊस, रेस्टॉरंट व अन्य व्यवसाय करण्यास परवाने द्यावेत, असे आवाहन पेले फर्नांडिस यांनी केले.
आपणास दक्षिणेतून उत्तरेत बोलावले व आपण खात्रीने सांगू शकतो की, एक दिवस पारंपरिक मच्छीमारबांधव निश्चितपणे गोवा सांभाळेल असे फर्नांडिस म्हणाले.
या सोहळ्यास केरी सरपंच धरती नागोजी, सुलक्षा तळकर, तुयेतील प्रगती साळगावकर, पंच दिव्या गडेकर, अनुपमा मयेकर, मांद्रेचे पंच चेतना पेडणेकर, राजेश मांद्रेकर, सचिन राऊत, पालयेच्या सरपंच स्नेहा गवंडी, पंच राधा परब, रंजना परब, सागर तिळवे, अजित मोरजकर, सुभाष आसोलकर, सचिन राऊत, डॉ. बाबू फर्नांडिस, दयानंद मांद्रेकर, जुझे गुदिन्हो, आयरिश डिसोझा, आंतोन फर्नांडिस आदी उपस्थित होते.
हरमल पंचायत मंडळाला बाणावलीत येण्याची निमंत्रण
हरमल पंचायतीचे नऊ सदस्याचे पंचायत मंडळ असून हे मंडळ एकत्रित काम करीत आहे. आपण या मंडळाला बाणावलीत निमंत्रित करतो. बाणावलीतील किनाऱ्यानाजिक दिल्ली, पंजाबी अन्य परप्रांतीय नाहीत, याची पाहणी त्यांनी करावी. हरमल गावही असाच असावा, असे फर्नांडिस यांनी सांगितले.
आयोजन समितीचे अध्यक्ष प्रजॉय फर्नांडिस यांनी सरकारने किनारी भागांतील मच्छीमार बांधवांच्या डोक्यावर सीआरझेडच्या रूपाने टांगती तलवार लटकत ठेवली आहे. सरकारने सहानुभूतीने विचार करून मच्छीमाऱ्यांची घरे कायदेशीर करावीत तसेच त्यांना व्यवसाय वाढीसाठी परवाने द्यावेत. आमदार जीत आरोलकर यांनी दुसऱ्या वर्षीही रापोणकर फेस्ट यशस्वी केल्याबद्दल आभार मानले.
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा पंचायत सदस्य तारा हडफडकर, नानू हरमलकर व राघोबा कांबळी यांचा पेले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व समई देऊन सत्कार करण्यात आला. तसेच स्टार मेकिंग स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. तारा हडफडकर व राघोबा कांबळी यांनी मनोगत व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.