Crime News  Dainik Gomantak
गोवा

Margao Crime: मडगाव अपहरण प्रकरणात नवीन 'ट्विस्ट'! पोलिस 'ॲक्शन मोड'वर

Margao Kidnapping Case: मडगावचा साेन्‍याचा व्‍यापारी कुणाल रायकर याचे अपहरण करण्‍याचा जाे अयशस्वी प्रयत्‍न झाला होता. त्‍या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Kunal Raikar Kidnapping Case

मडगाव: मडगावचा साेन्‍याचा व्‍यापारी कुणाल रायकर याचे अपहरण करण्‍याचा जाे अयशस्वी प्रयत्‍न झाला होता. त्‍या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. खास सूत्रांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, या प्रकरणात तपास करणाऱ्या मडगाव पोलिसांच्‍या हाती एक नवीन पुरावा लागला असून त्‍या दृष्टिकोनातून त्‍यांनी तपासही सुरू केला आहे. वेगवेगळ्या मार्गाने या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत.

दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांना यासंदर्भात विचारले असता, या प्रकरणात आमचा तपास सुरू आहे आणि प्रत्‍येक पैलूची दखल घेत आम्‍ही तपास करीत आहोत, असे उत्तर त्‍यांनी दिले. २३ ऑक्‍टोबर रोजी कुणाल रायकर यांचे आके-मडगाव येथून अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न झाला होता.

बुरखा घातलेल्‍या तीन व्‍यक्‍ती गाडीतून येऊन त्‍यांनी रायकर याला बंदुकीचा धाक दाखवून त्‍याचे अपहरण करण्‍याचा प्रयत्‍न केला हाेता. मात्र, त्‍याचवेळी रायकरने अपहरणकर्त्यांशी झटापट केल्‍याने आणि त्‍याचवेळी वाटेवर असलेले लोक त्‍याच्‍या मदतीला धावून आल्‍याने हा अपहरणाचा प्रयत्‍न फसला होता. यावेळी कुणाल रायकर याने आपला संशय रुबेन वेर्णेकर याच्‍या नावे व्‍यक्‍त केल्‍याने पोलिसांनी त्‍याची चाैकशीही सुरू केली हाेती. मात्र, या प्रकरणात वेर्णेकर याचा समावेश असल्‍याचा कुठलाही ठोस पुरावा पाेलिसांच्‍या हाती लागला नव्‍हता.

दुसऱ्याच व्यक्तीवर संशय?

आता पोलिसांना जी माहिती मिळाली त्‍यात या प्रकरणात दुसऱ्याचा कुणाचा तरी हात असण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे. या संशयिताच्‍या विरोधात अशाप्रकारचा आणखी एक गुन्‍हा यापूर्वी नोंद झाला होता.

त्‍यामुळे या प्रकरणात त्‍याच संशयिताचा हात असू शकतो, ही शक्‍यता गृहीत धरून पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे. या प्रकरणात काल काहीजणांची चाैकशीही मडगाव पोलिसांनी केल्याची माहिती पुढे आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: मोले येथे ट्रक कलंडला!

Goa BJP: तानावडेंसमोर तवडकर ठाम! समजूत काढण्यासाठी आता पुढच्या आठवड्यात बैठक

Cuchelim: 'कुचेली कोमुनिदाद'बाबतीत गोवा खंडपीठ गंभीर! कारवाईचे दिले निर्देश; 'ती' 4 घरे पाडली जाणारच

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

SCROLL FOR NEXT