New resolution of Mormugao Municipality for the city was discussed and the resolution was passed  Dainik Gomantak
गोवा

मुरगाव पालिकेचे शहरासाठी नवे संकल्प, चर्चा करुन ठराव संमत

मुरगाव पालिकेत महत्वाच्या विषयांवर चर्चा

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागू झाल्याने गेले दोन महिने मुरगाव पालिका मंडळाची बैठक होऊ शकली नव्हती. त्यामुळे काही कारणास्तव तहकूब करण्यात आलेली बैठक बुधवारी घेण्यात आली. यात काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

बुधवारी झालेल्या मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत वाटेल तेथे कचरा (Garbage) टाकणाऱ्याविरोधात कारवाई करता यावी यासाठी सीसीटिव्ही कॅमेऱ्यांची सोय, मान्सूनपूर्व कामांना गती देण्याचा निर्णय अशा सूचना नगरसेवक विनोद किनळेकर यांनी केली. इतर काही महत्वाच्या विषयांवर चर्चा होऊन निर्णय घेण्यात आले. येथील भटक्या गुरांसंबंधी चर्चा करण्यात आली. सरकारी (Government) योजनेनुसार भटक्या गुरांना पकडून गोशाळेत त्यांची सोय करण्याच्या विषयावर चर्चा करुन ठराव संमत करण्यात आला.

येथे दारोदार कचरा गोळा करण्याच्या उपक्रमासंबंधी चर्चा करण्यात आली. दारोदार कचरा करताना त्यासाठी प्रतिमहिना ठराविक रक्कम संबंधितांकडून घेतली जाते. परंतू भविष्यात असे न करता वार्षिक रक्कमच घरपट्टीच्या रक्कमेत मिळावावी. इतर पालिका अशी पद्धत अमलात आणत असल्याचे चर्चेप्रसंगी स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान मुरगाव (Mormugao) पालिका क्षेत्रामध्ये अवैध बांधकामे असल्याने त्यांना घरपट्टी लागू झालेली नाही. त्यामुळे काही अडचणी उभ्या राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. येथे किती घरांना घरपट्टी आहेत व किती घरांना घरपट्टी नाही यासंबंधी सर्वेक्षण करूनच पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितले.

मान्सूनपूर्व कामासंबंधीही चर्चा करण्यात आली. पावसाळा नजीक येऊन ठेपल्याने कामाला गती देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. गतवर्षी मुरगाव पालिका (Municipality) मंडळावर प्रशासक असल्याने मान्सूनपूर्व कामे ठराविक वेळेत पूर्ण न झाल्याने वास्कोवासियांना काही अडचणींना सामोरे जावे लागले होते. मान्सुनपूर्व काम लवकर व्हावी यासाठी योग्य ती समंती घेऊन रोजंदारीवरील कामगार घ्यावेत. त्या कामगारांना यापूर्वी वेळेवर वेतन न मिळाल्याने त्यांनी कामाला नकार दिला होता.त्यामुळे त्यांचे वेतन वेळेवर मिळेल यासंबंधी खबरदारी घेण्याची सूचना नगरसेवक दीपक नाईक यांनी केली.

प्रभाग क्रमांक बाराच्या बायणा मासळी (fish) मार्केटासमोरच्या कचरा संकलन केंद्रामध्ये इतर प्रभागांतील कचरा ओतण्यात येत असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होते.बरेचजण कचरा रस्यावर टाकत असल्याने पादचारी व वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. त्यासाठी प्रत्येक प्रभागामध्ये कचरा संकलन केंद्र उभारण्याची गरज नाईक व्यक्त केली. शहर भागातील काही कचरा स्थळांच्या जागांचे सौंदर्यीकरण करण्यासंबंधी शमी साळकर यांनी सूचना मांडली. तसेच गटारांतील गाळाचा योग्य उपसा करण्याची मागणी त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT